Nashik Political | विधानसभा निवडणूक 2024 ची मतमोजणी प्रक्रिया अजून सुरू असून अनेक मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले आहे. आज महायुतीने सर्वाधिक जागा मिळवत ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे.
Nashik Political | नाशकात अजित पवार गटाने रोवला विजयाचा झेंडा; दिलीप बनकर विजयी
इगतपुरी आणि देवळाली मतदारसंघात युतीने मारली बाजी
नाशिकच्या 15 मतदारसंघांपैकी बऱ्याच मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले आहे. देवळाली मतदारसंघातून अजित पवार गटाच्या सरोज आहेर यांचा विजय झाला असून या मतदारसंघात महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे योगेश घोलप हे निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांचा पराभव झाला आहे. तसेच या मतदार संघात राजश्री आहेरराव शिंदे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्याचबरोबर, इगतपुरी मतदार संघातील महायुतीचे अजित पवार गटाचे हिरामण खोसकर यांनी बाजी मारत विजय मिळवला असून इगतपुरी मतदार संघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या लकीभाऊ जाधव यांना संधी देण्यात आली होती. त्यांचा पराभव झाला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम