Nashik Political | आज दिनांक 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक 2024 साठी मतमोजणीला सुरुवात झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील 15 मतदारसंघांपैकी बऱ्याच मतदारसंघाचे आता चित्र स्पष्ट व्हायला सुरुवात झाली असून अशातच आता नाशिक जिल्ह्यातील पहिला निकाल हाती आला आहे. निफाड मतदार संघातील अजित पवार गटाचे उमेदवार दिलीप बनकर विजयी झाले आहेत.
Assembly Election Result | नाशिक पश्चिममध्ये सिमा हीरे तर दिंडोरी मतदारसंघात नरहरी झिरवाळ आघाडीवर
नाशकात अजित पवार गटाचा पहिला विजय
महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार दिलीप बनकर हे 28 हजार 697 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी नाशिक जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पहिला आमदार निवडून येण्याचा मान मिळवला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम