Assembly Election Result | बागलाणमध्ये दिलीप बोरसेंच्या हाती विजयाचा झेंडा!

0
37
#image_title

Assembly Election Result | राज्यसह संपूर्ण देशभराचे लक्ष लागून राहिलेल्या विधानसभा निवडणूक 2024 साठी मतमोजणी या प्रक्रिया पार पडत असून आतापर्यंत बऱ्यापैकी चित्र स्पष्ट झाले आहे. महायुतीने महाविकास आघाडीला दणका देत दणदणीत विजय मिळवला असून भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील 15 ही मतदारसंघांपैकी बऱ्याच मतदारसंघाचे चित्र आता स्पष्ट झाले असून इथे देखील भाजपने मुसंडी मारली आहे. काही वेळापूर्वी भाजपचा पहिला निकाल हाती आला होता. त्यानंतर नाशिकच्या पश्चिम मतदार संघातून सीमा हिरे विजयी झाल्या होत्या. आता भाजपचा दुसरा निकाल हाती आला असून बागलाणमधून दिलीप बोरसे विजयी झाले आहेत.

Assembly Election Result | नाशिक पश्चिममध्ये सिमा हीरे तर दिंडोरी मतदारसंघात नरहरी झिरवाळ आघाडीवर

भाजपचे इतरही उमेदवार विजयाच्या वाटेवर

विसाव्या फेरीत 1 लाख 29 हजार 638 मतांनी विजय प्राप्त करत दिलीप बोरसे यांनी विजयाचा गुलाल उधळला असून नाशिक मध्य मतदार संघातून भाजपच्या देवयानी फरांदे या 17,835 मतांनी आघाडीवर आहेत. नाशिक पूर्व मधून राहुल ढिकले 68 हजार 387 मतांनी आघाडीवर असून चांदवड-देवळा मतदार संघातून भाजपचे डॉ. राहुल आहेर 44 हजार 625 मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे यातून भाजपाचे उमेदवार विजयाच्या दिशेने कुच करत असल्याचे दिसत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here