Nashik Political | नाशिक पूर्वमध्ये भाजपचे विद्यमान आमदार राहुल ढिकले आणि शरद पवार गटाचे गणेश गीते यांच्यात थेट लढत होती. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात लक्ष्मीदर्शन झाल्याचीही चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. त्यामुळे येथे ‘काटे की टक्कर’ होईल असे वाटत होते. मात्र, पुन्हा एकदा नाशिक पूर्व मध्ये कमळ फुलणार हे चित्र स्पष्ट झाले असून, केवळ अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी आहे.
Nashik Political | देवळाली आणि इगतपुरीत अजित पवार गटाने गड राखला!
नाशिकमध्ये फरांदेंची हॅट्रिक
तर, नाशिकमधील दुसरा मतदारसंघ म्हणजे नाशिक मध्य मतदारसंघात भाजपच्या देवयानी फरांदे आणि ठाकरे गटाचे माजी आमदार वसंत गीते यांच्यातही थेट लढत होती. गेल्या अनेक दिवसांपासून यांच्यात शीतयुद्ध सुरू होते. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी दोघे आमनेसामने आले. कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी झाली. त्यानंतर गीते यांच्या कार्यालय अतिक्रमणात आल्याचे कारण देत पाडण्यात आले. त्याचेही आरोप फरांदेंवर करण्यात आले होते. त्यामुळे याचा निवडणुकीत कसा परिणाम होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार होते. दरम्यान, अखेर नाशिक मध्य मतदारसंघातून देवयानी फरांदे यांनी हॅटट्रिक केली असून, तिसऱ्यांदा येथे कमळ फुलले आहे.
Nashik Political | नाशकात अजित पवार गटाने रोवला विजयाचा झेंडा; दिलीप बनकर विजयी
सीमा हिरे यांनी विजयश्री खेचून आणली
नाशिक पश्चिम मतदारसंघ हा नाराजी नाट्यामुळे चांगलाच चर्चेत होता. भाजपकडून येथून दिनकर पाटील हे उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र भाजपने पुन्हा सीमा हिरे यांना संधी दिल्याने त्यांनी मनसेच्या इंजिनवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने महायुती आणि आघाडी दोघांचीही डोकेदुखी वाढली होती. मात्र बडगुजर आणि बंडखोर पाटील यांचा दारुण पराभव करत सीमा हिरे यांनी विजयश्री खेचून आणली आहे. तिसऱ्यांदा सीमा हिरे यांनी विजयाची परंपरा कायम राखत हॅटट्रिक केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम