Malegaon | मालेगाव बाह्य मतदारसंघात महायुतीकडून दादा भुसे महाविकास आघाडीकडून अद्वय हिरे आणि अपक्ष उमेदवार बंडु काका बच्छाव या तिघांमध्ये तिरंगी लढत रंगली होती. सुरुवातीला येथे कट टू कट आणि टफ फाईट होईल असे चित्र होते. मात्र, मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून दादा भुसे यांनी आघाडी घेतली आणि ती आता तब्बल 24 व्या फेरीपर्यंत कायम ठेवली आहे. तब्बल एक लाखांपेक्षा जास्त लीडने दादा भुसे विजयी होतील, असे चित्र दिसत असून, विरोधी उमेदवार अद्वय हिरे यांच्यावर डिपॉझिट जप्त व्हायची वेळ आली आहे.
Malegaon News | मालेगाव बाह्य मतदार संघात दादा भुसे यांची आघाडी कायम
अद्वय हिरे यांचे डिपॉझिट जप्त होणार?
दरम्यान, ठाकरे गटाचे अद्वय हिरे यांचे डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता असून, आपले डिपॉझिट वाचवण्यासाठी त्यांना 43 हजार 159 मतांची आवश्यकता आहे.
Dada Bhuse | दादा भुसे यांनी केला एक लाख मतांचा टप्पा पार; सर्व विरोधक मिळून निम्म्यावरच
1 लाखाचा टप्पा पार
तर 24 व्या फेरीअंती दादा भुसे यांनी एक लाखाचा आकडा पार केला असून मशालीला 36 हजार 529 धनुष्यबाणाला एक लाख 51 हजार 193 परीक्षाला 49 हजार 852 मते मिळाली असून एक लाख 733 मतांची आघाडी मिळाली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम