Dada Bhuse | आज राज्यभरात विधानसभा निवडणूक 2024 ची मतमोजणी प्रक्रिया पार पडत असून अनेक ठिकाणी विजय निश्चित झाले आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होती. या लढतीत महायुतीने महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला असून विक्रमी आकडा गाठत एक हाती सत्ता मिळवली आहे. त्यामुळे राज्यात महायुतीची सत्ता कायम राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
Malegaon News | काटवन परिसरात भूसेंची जोरदार मुसंडी; विजयाच्या दिशेने वाटचाल
मालेगावात दादा भुसे यांनी पार केला एक लाख मतांचा टप्पा
दरम्यान, मालेगाव बाह्य मतदार संघात महायुतीकडून शिंदेसेनेचे उमेदवार दादाजी भुसे निवडणुकीच्या रिंगणात होते. तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे अद्वहिरे प्रतिस्पर्धी होते. त्याचबरोबर अपक्ष उमेदवार बंडूकाका बच्छाव हे देखील मालेगाव बाह्य मतदार संघात निवडणुकीच्या रिंगणात होते. निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली असून दादा भुसे सकाळपासूनच लीड मिळवत आघाडीवर होते. तर आता 18 व्या फेरीअंती दादा भुसे यांनी एक लाख मतांचा टप्पा पार केला असून धनुष्यबाणाला 107267 मते मिळाली आहेत. तर मशालीला 28805 रिक्षाला 39288 इतकी मते मिळाली आहेत. तर 67,515 मतांची आघाडी मिळाली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम