Nashik Political | युतीत पक्षांतर्गत वाद सुरूच; शिंदे गटाच्या नेत्याचा छगन भुजबळांवर गंभीर आरोप

0
46
#image_title

Nashik Political | राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर आता निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी प्रचाराला सुरुवात केली असून राज्यभरात सभा व मिळावे पार पडत आहेत. अशातच नाशिकमध्ये महायुतीतील धुसफुस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

Nashik Politics | अखेर 15 मतदार संघाचे चित्र स्पष्ट; 137 उमेदवारांची माघार, 200 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

हेमंत गोडसे यांचे भुजबळांवर गंभीर आरोप

शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते व नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी एका सभेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी, “लोकसभा निवडणुकीवेळी छगन भुजबळांनी सांगितले कि, माझी उमेदवारी केंद्रातून जाहीर झाली. पण नंतर बोलले की आता उशीर झाला व ते रणांगण सोडून पळाले. शिवसैनिक पळून गेले नाहीत. भुजबळ लोकसभेत आपल्या सोबत राहिले व माझ्या पाठीत खंजिर खुपसला” असा खळबळजनक आरोप केला आहे.

लोकसभेतील पराभवावरून हेमंत गोडसे भुजबळांवर आरोप

दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते मंत्री छगन भुजबळ हे इच्छुक होते. परंतु त्यानंतर छगन भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती व त्यांची उमेदवारी शेवटच्या क्षणी हेमंत गोडसे यांना जाहीर करण्यात आली होती. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे हे निवडणुकीच्या रिंगणात होते. अखेर राजाभाऊ वाजे यांनी हेमंत गोडसे यांचा पराभव केला. या पराभवावरूनच आता शिवसैनिकांच्या मेळाव्यात हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळांवर आरोप केले आहेत.

Nashik Politics | अखेर बंडोबांना मनवण्यात महायुतीला यश; नाशिक मध्य मधून दोन नेत्यांची माघार

देवळाली मतदारसंघात महायुतीत बंडखोरी

महायुतीकडून देवळाली विधानसभेतून राष्ट्रवादीच्या सरोजा अहिरे यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्यावर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या राजश्री अहिरराव यांनी पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म जोडलेला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजश्री अहिरराव यांनी अर्ज मागे न घेतल्यामुळे देवळाली विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here