Nashik Politics | अखेर बंडोबांना मनवण्यात महायुतीला यश; नाशिक मध्य मधून दोन नेत्यांची माघार

0
68
#image_title

Nashik Politics | राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी, विरोधक व अपक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आता अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे युती आणि आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडून आपापल्या पक्षातील बंडखोरांना थंड करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना आता कितपत यश येते हे अर्ज माघारी नंतर आज दुपारी 3 वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे. परंतु त्या आधी नाशिक मधील मध्य विधानसभा मतदारसंघात बंडखोरांना थंड करण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आले आहे.

Nashik Political | नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात युती, आघाडीला मनसेचे तगडे आव्हान

बंडोबांना मनवण्यात महायुतीला यश

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून देवयानी फरांदे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर यामुळे नाराज होत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आता हा उमेदवार आपला अर्ज मागे घेणार असल्याने फरांदेना मोठा दिलासा मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु ते आता आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मनसेकडूनही माघार

त्याचबरोबर महायुतीचा भाग नसले तरी भाजपला काही मतदारसंघात साथ देणारे मनसेचे नेते राज ठाकरे यांनीही नाशिक मध्य मतदार संघातून आपल्या उमेदवाराला माघार घेण्याच्या सूचना दिल्याची माहीत आहे. या मतदारसंघातून मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांना उमेदवारी दिली होती. परंतु आता पवार हे माघार घेणार असल्यासची माहिती समोर आली असून भाजपाच्या उमेदवार फरांदे यांचा जीव अखेरीस भांड्यात पडला आहे.

Nashik Political | नाशिक पूर्व मतदारसंघात डमी उमेदवार देण्याची खेळी; गणेश गीतेंचा गंभीर आरोप

आघाडीत बिघाडी कायम

दरम्यान महायुतीच्या उमेदवाराला नाशिक मध्य मतदारसंघातून दिलासा मिळाला असला तरी महाविकास आघाडीमध्ये मात्र अजूनही बिघाडी कायम असल्याचे चित्र आहे. या मतदारसंघातून पक्ष उमेदवार म्हणून काँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्या ही निवडणूक लढविण्यावर ठाम असल्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते यांची चिंता मात्र वाढली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here