BJP Politics | राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुती व महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून उमेदवारी याद्या आता जाहीर होऊ लागल्या असून काही जागांवरील तिढा अजून कायम आहे. मात्र, महायुती आणि महाआघाडीतील घटक पक्षांकडून उमेदवारांची घोषणा करण्यात येत आहे. अशातच आता भाजपाची 22 जणांची दुसरी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे.
Nashik Political | नाशिक पूर्व मध्ये भाजपला फटका; भाजपला राम राम ठोकत गणेश गीते तुतारी फुंकणार!
नाशिक मध्यचा तिढा सुटला!
या यादीत नाशिक जिल्ह्यातील नाशिक मध्य मतदारसंघाचा उमेदवार जाहीर करण्यात आला असून नाशिक मध्य मतदार संघातून भाजपाच्या विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून असलेला नाशिक मध्यचा तिढा अखेर सुटला आहे.
भाजपची दुसरी उमेदवार यादी पुढीलप्रमाणे:
धुले ग्रामीण – श्री राम भदाणे
मलकापुर – चैनसुख मदनलाल संचेती
अकोट – प्रकाश गुणवंतराव भारसाकले
अकोला पश्चिम – विजय कमलकिशोर अग्रवाल
वाशिम (अजा) – श्याम रामचरणजी खोडे
मेळघाट (अजा) – केवलराम तुलसीराम काले
गडचिरौली (अजा) – मिलींद रामजी नरोटे
राजुरा – देवराव विठोबा भोंगले
ब्रह्मपुरी – कृष्णलाल बाजीराव सहारे
वरोरा – करण संजय देवतले
नाशिक मध्य – देवयानी सुहास फरांदे
विक्रमगढ़ (अजा) – हरिश्चंद्र सखाराम भोये
उल्हासनगर – कुमार उत्तमचंद आयलानी
पेन – रवींद्र दगडू पाटिल
खडकवासला – भिमराव तापकीर
पुणे छावनी (अजा) – सुनील ज्ञानदेव कांबले
कस्बा पेठ – हेमंत नारायण रासने
लातूर ग्रामीण – रमेश काशीराम कराड
सोलापुर शहर मध्य – देवेंद्र राजेश कोठे
पंढरपुर – समाधान महादेव आवताड़े
शिराला – सत्यजित शिवाजीराव देशमुख
जत – गोपीचंद कुंडलिक पडलकर
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम