Political News | शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने देवळाली मतदारसंघातून योगेश घोलप यांना शनिवारी उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर माजी मंत्री बबन घोलप यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा राजीनामा देत, शब्द पाळला आहे. देवळाली मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला उमेदवारी दिली जाणार होती. या मतदारसंघात मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे या विजयी झाल्या होत्या. परंतु त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केल्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेला.
Political News | कागलमध्ये मुश्रीफ-घाटगे समर्थक आमने-सामने; एकमेकांची कॉलर पकडत जोरदार हाणामारी
देवळाली मतदार संघ शिवसेनेला द्यावा अशी कार्यकर्त्यांची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लक्ष्मण मंडले यांची उमेदवारी जवळपास निश्चित केली होती. परंतु शेवटच्या क्षणी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी आक्रमक होत, हा शिवसेनेचा मागील 30 वर्ष बालेकिल्ला राहिला आहे. असे म्हणत पक्षाने माजी आमदार योगेश घोलप यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली. देवळाली मतदारसंघ शिवसेनेला द्यावा असा हट्ट नेत्यांनी धरल्यानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी देखील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे प्रतिष्ठा पणाला लावली. मात्र शिवसेनेला हा मतदारसंघ घेण्याआधी व योगेश घोलप यांना उमेदवारी देण्या आधी बऱ्याच घडामोडी घडल्या.
शिवसेनेचे नेते शरद पवार यांना भेटले होते. त्यावेळी आधी घोलप कुटुंब एकत्र आहे का? असा सवाल विचारण्यात आला. घोलप कुटुंबीयांनी एकत्र यावे. अशी सूचना करण्यात आली. शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील माजी मंत्री घोलाप यांनी शिंदे यांच्या पक्षातून राजीनामा द्यावा अशी सूचना केली होती. त्या सूचनेप्रमाणे, माजी मंत्री घोलप यांनी आज शिवसेना शिंदे गटाचा राजीनामा दिला. तसेच त्या राजीनामा पत्रात त्यांनी मुलाला उमेदवारी मिळाल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी देत उपकार केले आहेत अस म्हणत त्यांचे आभार मानले. त्यांच्या या पत्राने कार्यकर्त्यांना देखील एक संदेश गेला आहे.
Shivsena UBT | शिवसेना उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर; या 15 उमेदवारांना मिळाली संधी
पत्रात काय म्हणाले बबन घोलप?
माजी मंत्री घोलप यांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले असून चर्मकार समाजाच्या विविध समस्या आणि मागण्या होत्या. त्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री त्यांची चर्चा झाली होती. त्या सोडविण्याच्या आश्वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र त्याबाबत काहीही निर्णय झाला नसल्यामुळे समाज नाराज आहे. समाजाच्या दबावामुळे आपल्याला पक्षाचा राजीनामा द्यावा लागत आहे. असे मुख्यमंत्री शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे. तसेच या पत्रात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने योगेश घोलप यांना उमेदवारी देत माझ्यावर ठाकरे यांनी उपकार केले आहेत. असे म्हटले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम