Congress Political | आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आली असली, तरी जागा वाटपावरून महायुती आणि महाआघाडीत काही जागांवरील तिढे अजूनही कायम आहेत. त्यात नाशिक मध्य मतदारसंघ आणि येथील उमेदवारीचा विषय वादाचा ठरला असून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने माजी महापौर वसंत गीते यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच माझी महापौर गीते यांच्या प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे.
नाशिक मध्याच्या जागेवरून काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नाराजी
नाशिक मध्य मतदार संघासाठी महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेस आग्रही होता. त्याकरिता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. परंतु शिवसेनेच्या आक्रमकतेपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. त्यामुळे नाशिक मध्य मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला सोडवण्यात आला. माझी महापौर वसंत गीते यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली असली तरी या मतदारसंघाचे जागावाटप स्थानिक काँग्रेस नेत्यांना पटलेले नाही.
BJP Politics | भाजपची दुसरी यादी जाहीर; नाशिक मध्यचा तिढा सुटला!
हेमलता पाटील अपक्ष म्हणून लढणार!
त्यामुळे यावरून सुरू झालेला वाद निवाळण्याची चिन्हे दिसत नसून परिणामी, महाविकास आघाडीत बंडाचे वारे वाहू लागले आहेत. यासंदर्भात आता काँग्रेस नेत्या डॉ. हेमलता पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आपली नाराजी व्यक्त केली असून “आम्ही शेवटपर्यंत काँग्रेस पक्षाकडून एबी फॉर्मची अपेक्षा करू पण जर पक्षाने एबी फॉर्म न दिल्यास अपक्ष उमेदवारी करण्यात येईल” अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम