Nashik News | नाशिक येथील देवळाली कॅम्प परिसरात आर्टिलरी सेंटरमध्ये प्रशिक्षणा दरम्यान तोफ गोळ्याचा स्फोट झाला असून या घटनेत दोन अग्नीवीर जवानांचा मृत्यू झाला आहे. तर एक जवान गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सैफत शित आणि गोविंद सिंग अशी मृत पावलेल्या जवानांची नावे असून या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर घटनेप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.
Nashik News | गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या भामट्यांना पकडण्यात लासलगाव पोलिसांना यश
तोफ गोळा लोड करताना स्फोट
अग्नीवीर योजना सुरू झाल्यापासून हे अग्नीवीर जवान याच परिसरात प्रशिक्षण घेत आहेत. काल गुरुवार दुपारी 12 वाजेच्या दरम्यान जवानांची एक तुकडी शिंगवे बहुलाल फायरिंग रेंजमध्ये सरावासाठी केली असता या ठिकाणी दोन अग्नीवीर जवानांना तोफेचा गोळा लोड करण्याचे प्रशिक्षण दिले जात होते. यावेळी तोफेचे गोळा लोड करत असताना अचानक भीषण स्फोट झाला या स्फोटाच्या तीव्रतेमुळे दोन्ही जवानांच्या शरीरात बॉम्बचे शेल घुसले, ज्यामुळे दोन्ही जवानांचा मृत्यू झाला आहे.
Nashik News | त्र्यंबकेश्वर येथे पर्यटनासाठी आलेल्या 10 मुलांचा दहशतवादी विरोधी पथकाकडून तपास सुरू
याप्रकरणी सखोल चौकशी केली जाणार
तसेच एक अग्नीवीर यामध्ये गंभीर जखमी झाला आहे. कॅम्पमधील इतर जवानांनी तिघांनाही तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचार सुरू असताना जवान गोविंद सिंग आणि सैफत शित यांचा मृत्यू झाला. तर या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून या घटनेची पोलिस आणि लष्करी विभागाकडून चौकशी केली जाणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम