सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | कै. पंडित धर्मा पाटील यांचे सहकार, कृषी व जलसिंचनाच्या क्षेत्रातील कार्य हे आजच्या पिढीला फायदेशीर असून त्यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वामुळे शिक्षणाबरोबरच कृषी क्षेत्रातील विकासाची दिशा १९६२ पासून बदलली असून त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबरोरच देशातील शेतकऱ्यांना फायदा झाला असे प्रतिपादन खर्डे येथील इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य संजय आहेर यांनी केले.
Deola | एस. के. डी. व व्ही. के. डी. स्कूलच्या विद्यार्थ्यांचे कराटे परीक्षेत यश
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दरवाजे खुले केले
खर्डे ता. देवळा येथील विधाय कार्य समिती संचलित येथील इंदिरा गांधी विद्यालयात कै. पंडित धर्मा पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, बागलाण प्रांतांत आदिवासी व दलितांच्या उद्धारासाठी त्यांनी जे कार्य केले त्यामुळे ते समाजात लोकनेते व दलितमित्र म्हणून ओळखले गेले. १९६२ मध्ये विधानसभेचे कामकाज मराठीतून चालवावे ही आग्रहाची मागणी केली. खेड्यात जाऊन नाशिक जिल्हा विधायक कार्य समिती संस्थेच्या माध्यमातून अनेक शाळा काढून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दरवाजे खुले केले. यावेळी विद्यार्थ्यांनी भाऊंच्या जीवन कार्याबद्दल भाषणं केली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच जिभाऊ मोहन, उपसरपंच सुनील जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मधुकर देवरे, पालक संघाचे उपाध्यक्ष शशिकांत ठाकरे उपस्थित होते.
Deola | डॉ. नूतन आहेर व सुनील आहेर यांच्या हस्ते कार पाझर तलावाचे जलपूजन संपन्न
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कै. पं. ध. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. एच एन सोनवणे, एस डी बागुल, डी. पी. परचुरे, ए. के. आढाव, पी. के. दळवी, पी. ए. देवरे, आर. के. ठाकरे, एस. के. बागुल, पी. डी. काकुळते यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन कैलास चौरे यांनी केले तर आभार व्ही. एस. महाले यांनी मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम