Deola | डॉ. नूतन आहेर व सुनील आहेर यांच्या हस्ते कार पाझर तलावाचे जलपूजन संपन्न

0
49
#image_title

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | तालुक्यातील पश्चिम भागातील कांचणे येथील वळण योजनेच्या लाभक्षेत्रातील कनकापूर येथील कार पाझर तलावाचे जलपूजन माजी जिल्हा परिषद सदस्या डॉ. नूतन आहेर व सुनील आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. देवळा तालुक्यातील अतिदुर्गम अशा कनकापूर परिसरात असलेल्या कार पाझर तलाव लाभक्षेत्रातील शेतकरी गेल्या अनेक वर्षपासून सिंचनाच्या पाण्यापासून वंचित होते.

Deola | पी.के. आप्पा आहेर पतसंस्थेच्या चेअरमनपदी डॉ.नूतन आहेर

पाणी प्रश्न मार्गी लावल्याबद्दल ग्रामस्थांकडून आभार मानण्यात आले

या ठिकाणी ऐतिहासिक अशा कांचणे किल्ल्यावरील पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी वाखारी जिल्हा परिषद गटाच्या माजी सदस्या डॉ. नूतन आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून वळण योजनेच्या माध्यमातून पाणी आडवण्यात येऊन ते पाणी थेट कार पाझर तलावात टाकण्यात आल्याने या पाझर तलावाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न मार्गी लागल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या वर्षी झालेल्या समाधान कारक पाऊसामुळे या योजनेच्या माध्यमातून कार पाझर तलाव ओव्हरफ्लो झाले असून, त्याचे जलपूजन मंगळवारी दि. ८ रोजी माजी जि. प. सदस्या डॉ. नूतन आहेर यांच्या हस्ते संपन्न झाले व या भागातील पाणी प्रश्न मार्गी लागल्याबद्दल आहेर यांचे येथील ग्रामस्थांनी आभार मानले.

Deola | कणकापूर येथील गोशाळेला शासनाकडून अनुदान

जलपूजनाच्या कार्यक्रमाला यांनी लावली हजेरी

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवानेते सुनील आहेर, सरपंच बारकू वाघ, माजी उपसरपंच ॲड. तुषार शिंदे, श्रीराम शिंदे, गोविंद बर्वे, आबा सावकार, सुखदेव शिंदे, श्रावण गांगुर्डे, योगेश शिंदे, निंबा शिंदे, सिताराम शिंदे, अशोक शिंदे, दादाजी कोल्हे, भालचंद्र पवार, सुनील शिंदे, संजय बर्वे, गणेश शिंदे, समाधान शिंदे, अरुण शिंदे, सागर शिंदे, दिनू पवार, सिताराम सोनवणे, सतीश शिंदे, किशोर सावकार, माणिक सुखदेव, पिनु शिंदे, दादा बर्वे, जयदीप शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here