Dada Bhuse | मालेगांव शहरात अपर तहसील कार्यालय स्थापनेस मंजुरी मिळाली आहे. यामुळे प्रशासनात अधिक गतिमानता येणार आहे. मंत्री दादाजी भुसे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून नागरिकांची गैरसोय सोय टाळण्यासाठी शहरात अपर तहसील कार्यालय महत्वाचे ठरणार आहे. जिल्ह्याच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला असून. या निर्णयानंतर मंत्री दादाजी भुसे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच महसूल मंत्र्यांचे आभार मानले आहेत.
Dada Bhuse | दादा भूसेंनी दुसऱ्यांदा प्रशांत हिरेंना पराभवाची धूळ चारली…
अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे सेवेत अडचणी
तालुक्याचे जिल्हा मुख्यालयापासून सरासरी अंतर अधिक आहे. तसेच मालेगाव तालुक्यात महानगरपालिका आहे. तालुक्यातील वाढते नागरिकरण, शहरीकरण, लोकसंख्या व राजशिष्टाचार विषयक कामकाजाचा व्याप मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे तहसील कार्यालय मालेगाव येथे सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या अपुऱ्या कर्मचारी वर्गामध्ये जनतेला आवश्यक ती सेवा पुरविणे अडचणीचे ठरत आहे. मालेगाव येथील, वाढती लोकसंख्या, नागरीकरण विचारात घेता तसेच प्रशासन लोकाभिमुख करून कामकाजात गतीमानता आणणे याकरीता प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने मालेगाव येथे स्वतंत्र अपर तहसील कार्यालय स्थापन करुन त्याकरीता आवश्यक पदांची निर्मिती करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
चार पदे नियमित वेतनश्रेणीवर मंजूर
मालेगाव येथे अपर तहसील कार्यालय स्थापन करणे व त्याअनुषंगाने पद मंजुरीस व अन्य अनुषंगिक बाबीस शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. मालेगाव तहसील कार्यालय बळकट करण्याच्या दृष्टीने अपर तहसीलदार मालेगाव यांच्या नवीन कार्यालयासाठी ४ पदे नियमित वेतनश्रेणीवर मंजुर करण्यास शासन मान्यता देण्यात आली, नाशिक जिल्ह्यातील तहसीलदार, मालेगाव तसेच अपर तहसीलदार, मालेगाव यांच्या कार्यक्षेत्रातील महसूल मंडळांतर्गत तलाठी साझे व त्यामध्ये अंतर्भूत होणाऱ्या गावांची यादी प्रसिध्द करण्याबाबतची कार्यवाही जिल्हाधिकारी, नाशिक यांचे स्तरावर करण्याचे निर्देश दिले आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम