Deola | वसाका विक्री न करता भाडेतत्त्वावर सुरू करण्याचा राज्य सहकारी बँकेचा निर्णय

0
62
#image_title

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | काल उपमुख्यमंत्री मा. श्री. अजित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील विठेवाडी येथील वसंत दादा सहकारी साखर कारखान्याची कोणत्याही परिस्थितीत विक्री होऊ न देता, कामगार व ऊस उत्पादकांचे हित लक्षात घेऊन कारखाना आगामी काळात भाडे करारानेच चालविण्यात येईल असा महत्वपूर्ण निर्णय बुधवार दि. ४ रोजी मुंबईत झालेल्या बैठकित घेण्यात आल्याची माहिती आमदार डॉ. राहुल आहेर यांनी दिली. या निर्णयाकडे वसाका कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक व कामगारांचे लक्ष लागून राहिले होते. कालच्या मा. अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत वसाका भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय झाल्याने कळवण, सटाणा, देवळा, चांदवड या चार तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या या कारखान्याच्या सभासद कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे.

Deola | किशोर सूर्यवंशी पतसंस्थेच्या वतीने रौप्य महोत्सवी वर्षात सभासदांना आकर्षक भेट वस्तूंचे वाटप

Deola | कारखाना विक्रीची निविदा प्रसिद्धी 

मधल्या काळात राज्य सहकारी बँकेने कर्ज वसुलीसाठी कारखाना विक्रीची निविदा प्रसिद्धी केली होती. या प्रक्रियेला कारखाना कार्यक्षेत्रातील सभासदांनी तीव्र विरोध दर्शविला होता. कारखान्याची कोणत्याही परिस्थितीत विक्री होऊ नये यासाठी वसाका कार्यस्थळावर सर्वपक्षीय आंदोलन छेडण्यात आले होते. यासाठी बचाव कृती समितीच्या माध्यमातून आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या शिष्टमंडळाने मध्यंतरी कळवण दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. व. ना. पवार यांनी याबाबत मुंबईत बँकेच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार काल बुधवारी झालेल्या बैठकीत वसाका हा भाडे करारानेच देण्यात येईल असे राज्य सहकारी बँकेने मान्य केले.

Deola | लोहोणेर येथील पायाभूत सुविधांच्या मागणीसाठी उ.बा.ठा. गटाचे उपोषण

यावेळी सहकार मंत्री ना. दिलीप वळसे पाटील, ना. हसन मुश्रीफ, आ. डॉ. राहुल आहेर, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अनासकर, अप्पर मुख्य सचिव वित्त ओ. पी. गुप्ता, विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था आर. एफ. निकम यांच्यासह कृती समितीचे पंडितराव निकम, विलास देवरे, अरुण सोनवणे, सुनील देवरे, कामगार प्रतिनिधी हिरामण बिरारी, विलास सोनवणे, नंदू जाधव, रवींद्र सावकार, नाना देवरे, मुरलीधर धामणे, सतीश शिरुडे आदींसह वित्त व सहकार विभागाचे तसेच राज्य सहकारी बँकेचे अधिकारी उपस्थित होते.(Deola)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here