Nashik News | जिल्ह्यातील सहा शिक्षकांचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान

0
15
Nashik News
Nashik News

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा राज्य स्तरावरचा सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांचा आदर्श शिक्षक पुरस्कार नाशिक जिल्ह्यातून खंडू मोरे, गुलाब दातीर, दिपाली अहिरे, प्रदीप देवरे, राजेश सावंत व किरण बाबा या सहा शिक्षकांना आज मुंबईत झालेल्या कार्यक्रमात शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, विधान परिषदेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, प्रधान सचिव आय.ए कुंदन, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, शिक्षण संचालक आदि मान्यवर उपस्थित होते.

शालेय शिक्षण विभागाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण आज मुंबईतील नरिमन पॉईंट टाटा थेटर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षण मंत्री दीपक केसरकर, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते झाले. “सध्याच्या युगामध्ये शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या बरोबरीने गतिमान होणे आवश्‍यक आहे. काळानुरूप झालेले बदल स्वीकारून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवायला हवे”, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.

Nashik News | नाशकात मराठा आंदोलकांनी काँग्रेस नेत्यांना घेरलं; वडेट्टीवारांचा केला निषेध

सर्वसाधारण गटातून बोकडदरे ता. निफाड येथील प्रदीप देवरे, आदिवासी क्षेत्रातून फांगदर ता. देवळा येथील खंडू मोरे, माळेगाव काजि ता. दिंडोरी येथील गुलाब दातीर, माध्यमिक गटातून मालेगाव येथील के.आर.टी हायस्कुलचे किरण बाबा, नाशिक विभागातून दिला जाणारा ‘सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षिका पुरस्कार’ शासकीय कन्या शाळा नाशिकच्या उपशिक्षिका दिपाली अहिरे व राज्यस्तरावरील कला शिक्षकाचा डी.डी बिटको हायस्कूल नाशिक शाळेचे राजेश सावंत या अशा सहा शिक्षकांना शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते राज्यातील ११० शिक्षकांना ह्या कार्यक्रमात राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देत गौराविण्यात आले. स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्रक व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here