सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य असले तरी सध्याच्या अनेक बसेस प्रवाशांना सेवा देण्यास कमी पडत असल्याचे चित्र आहे. रविवार (दि .१) रोजी दुपारी साडे चार वाजता सटाणा आगारातून निघालेल्या सुरत अहमदनगर बस क्रमांक एम. एच. 14 के. ए. 9845 या बसचे चाक निखळून पडल्याने ती देवळा नाशिक रस्त्यावर नादुरुस्त झाली. यामुळे सर्वच प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. सातत्याने बंद होणाऱ्या बसेसमुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. रविवार (दि .१) रोजी अहमदनगर आगाराची बस क्रमांक एम. एच. 14 के. ए. 9845 ही बस नाशिकच्या दिशेने जात असताना देवळा नाशिक रस्त्यावर रामेश्वर फाट्या नजीक मागचे एक चाक निखळून पडले. बस चालकाच्या प्रसंगावधानाने पुढील अनर्थ टळला.
Deola | संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांप्रमाणे संत सेना महाराजही श्रेष्ठ – केदा आहेर
Deola | रस्त्यांची दुरावस्थेमुळे प्रवाशांना त्रास
विंचूर-प्रकाशा या महामार्गाची देवळा ते भावडबारी घाटा दरम्यान रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. या महामार्गाचे काम गेल्या सहा महिन्यांपासून रखडल्याने रस्त्यावर वाहने चालवणे वाहनधारकांना जिकिरीचे झाले आहे. पावसाच्या दिवसांत याठिकाणी वारंवार छोटे-छोटे अपघात घडत असून वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रवाशांच्या जीवाशी चालू असलेला खेळ आणखी किती दिवस सुरू रहाणार असा प्रश्न पडू लागला आहे.
या रस्त्यावर सध्या एकेरी वाहतूक सुरू असून, देवळा ते रामेश्वर पर्यंत रस्त्याची खड्डयांमुळे चाळण झाली आहे. सदर बसचे चाक खराब रस्त्याअभावी निखळून पडल्याचे बोलले जाते. या बसमध्ये प्रवाशी होते. चालकाच्या प्रसंगावधानाणे पुढील अनर्थ टळला. मात्र एसटी महामंडळाच्या अनेक बस जुन्या असल्याने वारंवार रस्त्यांवर नादुरुस्त अवस्थेत आढळून येतात. यामुळे प्रवाशांना ऐन सणासुदीच्या दिवसात मनस्ताप सहन करावा लागतो आहे.
नवीन बस सुरू करण्याची मागणी
देवळा बस स्थानकात आज रविवारी दिवसभर नंदुरबार आगाराची बस नादुरुस्त अवस्थेत पडून होती. राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने बरोबरच लोकांना खुश करण्यासाठी सबसिडीसारख्या अनेक योजना सुरू केल्या असल्या तरी कित्येक वर्षांपासून जुनाट एसटी बस रस्त्याने धावताना दिसत आहेत. नागरिकांचा सुखर प्रवास व्हावा यासाठी सरकारने नवीन बस सुरू कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम