Deola | महावितरणाच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांवर अन्याय; नव्या वेळापत्रकामुळे शेतकरी त्रस्त

0
23
#image_title

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | महावितरण कंपनीने कळवण व देवळा अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांसाठी माहे- सप्टेंबर महिन्याचे कृषी वाहिन्यांचे थ्रिफेजचे वेळापत्रक जाहीर केले असून ते शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असल्याच्या प्रतिक्रिया देवळा तालुक्यातून उमटू लागल्याने त्यात तात्काळ बदल करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. नवीन वेळापत्रकानुसार रात्री – 9:10 ते 05:10 व दिवसा – 7:50 ते 03:50 या वेळात वीजपुरवठा केला जाणार आहे. महावितरणाचा या महिन्याचा हा टाईम टेबल लक्षात घेता सरकारला शेतकऱ्यांचा किती कळवळा आहे. हे यावरून दिसून येत आहे. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने मका, बाजरी आदी खरीप हंगामातील पिके चांगली आहेत. त्याच बरोबर आता पावसाळी कांदा लागवड देखील सुरू झाल्याने यात महावितरणच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Deola | प्रवाशांच्या जीवाशी खेळ; देवळ्यात बसचे चाक निखळले

Deola | महावितरणच्या नव्या नियमांनी शेतकरी त्रस्त

तालुक्यात बिबट्यांचा मुक्त संचार वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या सुमारास मळ्यात विज पुरवठा खंडित राहत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. महायुती सरकारने कृषी पंपासाठी मोफत वीजपुरवठा सुरू केला हे जरी खरे असले तरी दुसरीकडे वेळेत वीजपुरवठा होत नसल्याने याचा शेतकऱ्यांना काहीच फायदा नसल्याने नाराजीचा सूर उमटला आहे. नवीन वेळापत्रकानुसार रात्री 9:30 ते पहाटे 5:30 पर्यंत सुरू राहणार वीजपुरवठा दिवसा सकाळी 7:30 ते दुपारी 3:30 या वेळात सुरू राहणार आहे.

Deola | संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांप्रमाणे संत सेना महाराजही श्रेष्ठ – केदा आहेर

लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज

विज पुरवठयाच्या वेळापत्रकामुळे हिंस्र प्राणी आणि रात्रीच्या शॉर्ट सर्किटच्या भीतीने शेतकरी वर्ग पुरता वैतागून गेला असून, या गंभीर समस्याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे अशी ओरड सर्वत्र ऐकू येत आहे. याची दखल घेऊन महावितरण कंपनीने सदरचा टाईम टेबल बदलून वेळत व सुरळीत वीजपुरवठा करावा, जेणेकरून शेतात राहणाऱ्या लोकांना याचा दिलासा मिळेल आणि त्यांना भयमुक्त वातावरणात वावरता येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here