BJP President Resigns | भाजपला मोठा धक्का..!; बालेकिल्ल्यात जिल्हाध्यक्षांचा पक्षाला ‘राम राम’

0
73
BJP President Resigns
BJP President Resigns

BJP President Resigns | सध्या राज्यभरात राजकीय वर्तुळात एकच गोष्टीत सर्व व्यस्थ झाले आहेत ती म्हणजे येणारी विधानसभेची निवडणूक. सत्ताधारी, विरोधक, अपक्ष, स्वबळावर लढणारे असे सर्वच आता विधानसभेसाठी कंबर कसून तयारीला लागले आहेत. लोकसभेचा निकाल पाहता सत्ताधारी पक्षाला सत्तेत टिकून राहण्यासाठी जनतेचा पाठिंबा आवश्यक लागणार आहे. परंतु लोकसभेनंतर मात्र भाजपला वरचेवर फटके बसताना दिसत आहेत. अनेक नेत्यांनी विधानसभेच्या तोंडावर राजीनामे दिले आहेत. कोल्हापुरातील माजी आमदार बजरंग देसाई यांचे सुपुत्र राहुल देसाई यांनी आता आपल्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत भाजपसाठी नवं आव्हान उभे केले आहे.

Jansanman Yatra | महायुतीतील वाद चव्हाटयावर; भाजपने अजित पवारांना दाखवले काळे झेंडे

समरजीत घाटगेनंतर आता राहुल देसाई यांनी राजीनामा दिला असल्यामुळे भाजपला येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये अजून एक फटका बसला आहे. समरजीत घाटके तुतारी निवडणार असल्याची दाट शक्यता आहे. राधानगरी बुदरगड मतदार संघातून राहुल देसाई यांना उमेदवारी देऊ केली गेली होती. हीच मागणी करत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश मिळवला होता.

BJP President Resigns | भाजपची विकेट डाऊन

राहुल देसाई हे बजरंग देसाई यांचे सुपुत्र असून काँग्रेसमध्ये कार्यरत होते. त्यांचे वडील बजरंग देसाई काँग्रेसचे माजी आमदार आहेत. राहुल देसाई यांनी भाजपकडून विधानसभेमध्ये उमेदवारी मिळेल याच आशेने प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर झालेल्या बदलानंतर त्यांनी ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत भाजपाला ऐन विधानसभेच्या तोंडावर सोडचिट्टी दिली.

Rajyasabha Candidate | भाजपकडून राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर

शरद पवारांची भाजप विरोधात मोठी खेळी

सूत्रांनुसार, 23 ऑगस्टला होणाऱ्या भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात समरजीत घाटगे उपस्थित राहणार नसल्याच्या चर्चा आहेत. हा मेळावा शाहू सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर होणार असल्याची माहिती आहे. रात्री उशिरापर्यंत प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना निरोप गेला असल्याचे सांगितले जात आहे.

हा मेळावा समरजीत घाटगे यांनीच आयोजित केला असून ते मात्र याला उपस्थित राहणार नाहीत. तसेच उद्याच्या महायुतीच्या सभेला देखील ते अनुपस्थित असण्याची दाट शक्यता आहे. पुढच्या महिन्यातच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार असल्याची दाट शक्यता आहे. समरजीत घाटगे यांना हसन मुश्रीफ यांच्या विरोधात उभा करणार असल्याच्या सांगितले जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here