BJP Maharashtra | राज्यात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून, महायुतीला मोठे यश मिळाले. यानंतर महायुती आणि विशेषतः भाजप चांगलेच फॉममध्ये असल्याचे दिसत आहे. लोकसभेत चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी विधानसभेतील आपयशानंतर महाविकास आघाडीच्या गोटात नैराश्याचे वातावरण असल्याचे चित्र आहे. दरम्यान, एकीकडे राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची धूम असतानाच आता भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर आली असून, यानुसार आता भाजप राज्यात ‘ऑपेरेशन लोटस’ राबवण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
BJP Maharashtra | राज्यात पुन्हा फोडाफोडीचे राजकारण..?
लवकरच भाजप (BJP) महाविकास आघाडीला (Mahavikas Aaghadi) मोठा धक्का देण्याच्या तयारीत असून, महाविकास आघाडीतील अनेक खासदार विशेषतः शरद पवार गटाचे खासदार हे भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे आणि या वृत्ताला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही दुजोरा दिला आहे. यामुळे आता राज्यात पुन्हा फोडाफोडीचे राजकारण पहायला मिळणार का..? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.(BJP Maharashtra)
BJP vs Sharad Pawar | ‘भाजपाचा बडा नेता शरद पवारांच्या गळाला!’; विधानसभे आधीच भाजपला मोठं खिंडार
राज्यात विधानसभा निवडणुकीत(Vidhansabha Election) महायुतीला एकहाती सत्ता मिळाली आणि यानंतर महायुतीचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. त्यामुळे आता पुन्हा भाजप मविआला आणि विशेषतः शरद पवार गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असून, अनेक खासदार भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, असे झाल्यास याचा परिणाम केंद्रातील समीकरणावरही होणार आहे.
भाजप आमदाराचा दुजोरा..
याबाबत भाजप आमदार प्रवीण दरेकर (Praveen Darekar) म्हणाले की, महाविकास आघाडीचे अनेक खासदार आणि आमदार हे आमच्या संपर्कात आहेत. महाविकास आघाडीचे आणि विशेषत: शरद पवार गटाचे खासदार जिथे आहेत, तिथे बहुतांशी महायुतीचे आमदार निवडून आले आहेत. जर आपले राजकीय भविष्य नीट असावे आणि विकासाची मानसिकता असेल तर यासाठी शरद पवार गटाचे खासदार ही भूमिका घेऊ शकतात. आपल्याला आपल्या मंतदारसंघांचा विकास हवा असल्यास तो सत्तेच्या माध्यमातून अधिक गतीने करता येतो. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भक्कम सरकार आहे. त्यामुळे असा निर्णय घेतला जाऊ शकतो, असा दुजोरा दरेकर यांनी दिला आहे.(BJP Maharashtra)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम