Rajyasabha Candidate | भाजपकडून राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर

0
81
BJP President Resigns
BJP President Resigns

Rajyasabha Candidate :  राज्यसभेवरील रिक्त खासदारांच्या जागांसाठी निवडणूक ही येत्या काही दिवसांत पार पडणार आहे. महाराष्ट्रातील दोन जागा रिक्त असून, यापैकी एक जागा भाजपच्या तर एक जागा ही राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी सोडण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि खासदार उदयनराजे भोसले हे लोकसभेवर निवडून आल्याने त्यांची राज्यसभेवरील जागा रिक्त झाली होती. त्यानुसार आता या जागांसाठी निवडणूक पार पडणार असून, भाजपने राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने विविध राज्यातील आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली असून, यात महाराष्ट्रातील एका जागेवर भाजपकडून शेकापमधून भाजपमध्ये आलेल्या धैर्यशील पाटील (Dhairyasheel Patil) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील धैर्यशील पाटील (Dhairyasheel Patil) हे भाजपचे राज्यसभेसाठीचे उमेदवार (Rajyasabha Candidate) असणार आहेत.

Sunetra Pawar | अखेर दादांनी पत्नीला संसदेत पाठवलंच; सुनेत्रा पवार झाल्या खासदार

Rajyasabha Candidate | भाजपच्या राज्यसभा उमेदवारांची यादी..?

  1. आसाम –  मिशन रंजन दास, रामेश्वर तेली
  2. महाराष्ट्र –  धैर्यशील पाटील
  3. राजस्थान –  सरदार रबनित सिंह बट्टू
  4. हरियाणा –  श्रीमती किरण चौधरी
  5. बिहार –  मनन कुमार मिश्र
  6. मध्य प्रदेश –  जॉर्ज कुरियन
  7. ओडिशा –  श्रीमती ममता मोहंता
  8. त्रिपुरा – राजीव भट्टाचार्जी

Sunetra Pawar Rajya Sabha | पराभूत उमेदवाराला ‘बॅक डोअर एन्ट्री’ का..?; भुजबळांनी अजित पवारांना सुनावलं

कोण आहेत धैर्यशील पाटील..?

धैर्यशील पाटील यांची रायगडमध्ये मोठी ताकद असून, ते माजी आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे सध्याचे रायगड जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी रायगड-रत्नागिरी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठीही तयारी केली होती. मात्र, महायुतीत त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे भाजप त्यांची खासदार होण्याची इच्छा राज्यसभेवर पाठवून पूर्ण करणार असल्याचे दिसते. राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत धैर्यशील पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यात मोठे उत्साहाचे वातावरण आहे. यामुळे रायगड आणि कोकणात भाजपला मिळणार बळकटी आहे.

‘दादा वादा’ पूर्ण करणार अजित पवार गटाकडून ‘या’ नेत्याला उमेदवारी..?

दरम्यान, दुसरी रिक्त जागा ही भाजपने अजित पवार गटासाठी सोडली असून, अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून अद्याप अधिकृतरीत्या उमेदवारांची घसओहण करण्यात आली नसली. तरीही अजित दादांच्या वाद्यानुसार नितीन पाटील यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) साताऱ्यातील (Satara)वाईमधील एका सभेत बोलताना साताऱ्याची जागा निवडून आल्यास नितीन पाटील यांना खासदार करतो, असा वादा केला होता. हा ‘वादा दादा’ पूर्ण करणार असून, नितीन पाटील यांचे नाव जवळपास निश्चित आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here