सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | सहकारात अग्रगण्य अशी येथील दि देवळा मर्चंटस् को. ऑप. बँकेच्या नाशिक शाखेचे स्थलांतर व उद्घाटन सोहळा कार्यक्रम हा येत्या शनिवार (दि.२४) रोजी सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती चेअरमन कोमल कोठावदे, व्हा. चेअरमन डॉ. प्रशांत निकम व संचालक मंडळाने दिली. कर्मवीर शांताराम बापू वावरे कॉलेजसमोर, उत्तमनगर बस स्टॉप, उत्तमनगर, नाशिक येथे देमको बँकेची नाशिक शाखा आता अधिक सोयी, सुविधांनी युक्त नवीन जागेत स्थलांतरीत होत आहे.
Deola | देवळ्यात वृक्षारोपणाचा अनोखा संदेश; वडिलांच्या रक्षा नदीत विसर्जित न करता वृक्षारोपण
डॉ.श्री. विजय सुशिला सुर्यवंशी (IAS) आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभाग महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या शुभहस्ते होणाऱ्या या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सिमा हिरे उपस्थित राहणार असून, प्रमुख पाहुणे
डॉ. श्री. सुनिल ढिकले अध्यक्ष- नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशन, श्रीमती रत्नमाला राणे नगरसेविका उपस्थितीत राहणार आहेत. या कार्यक्रमास बॅंकेच्या सर्व सभासद, खातेदार व हितचिंतकांनी अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन जनसंपर्क संचालक योगेश वाघमारे आदींसह सर्व संचालक मंडळ व कर्मचारी वृंद यांनी केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम