वैभव पगार – प्रतिनिधी : दिंडोरी | आजच्या या आधुनिक काळात ‘शिकेल तोच टिकेल’ या तत्वाप्रमाणे विद्यार्थी फक्त भौतिक शिक्षणाच्या पाठीमागे पळताना दिसत आहेत. पंरतु फक्त लिहता वाचता येणे, म्हणजे शिक्षण नव्हे तर बुद्धीला सत्याकडे, शरीराला श्रमाकडे आणि माणसाला माणुसकीकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण होय आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे म्हेळूस्के येथील स्वामी विवेकानंद अभ्यासिका.
स्वाभिमानाने आयुष्य जगण्यासाठी फक्त शिक्षणच नव्हे तर संस्काराचे मुल्य किती महत्वाचे आहे. हे येथील अभ्यासिकेतील मुलांनी दाखवुन दिले आहे. गावातील एकुण ८१ मुलं या अभ्यासिकेत न चुकता रोज सायंकाळी येतात. योगासने, मुल्यशिक्षण, श्लोक पाठांतर तसेच मैदानी खेळ अशी अभ्यासिकेची रचना आहे आणि या उपक्रमाला गावकऱ्यांची देखील भरपुर दाद आहे. तसेच पालकांना आलेला विश्वास हे या उपक्रमाचे जणु बक्षिसच आहे. कला, कौशल्य, वृक्षारोपण तसेच प्रत्येक विद्यार्थ्याच्या वाढदिवसाला एक झाड देवून ते मोठं करायचे ही संकल्पना येथील अभ्यासिका शिक्षकांनी राबवुन आपण निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करू शकतो हा छान संदेश दिला आहे.
अभ्यासिकेत मिळणारी संस्काराची शिदोरी घेऊन कुटुंब व्यवस्था सुधारत चालली आहे. ‘हिच आमुची प्रार्थना अन् हेच आमचे मागणे, माणसाने माणसांशी माणसासम वागणे’ या ओळीप्रमाणे येथील प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये माणुसकीची नवचेतना निर्माण झाली आहे..भारतीय संस्कृतीचा झेंडा पाश्चात्य देशात रोवण्यार्या स्वामी विवेकानंदांना कदाचित अशाच तरुणांची अपेक्षा असेल. ग्रामविकास समिती आणि sparc Acadamy pune यांच्या या स्तुत्य उपक्रमाच्या माध्यमातून एक नवीन संस्कारी पिढी तयार होतेय याचे सर्वत्र कौतुक होत आहे. नैतिकतेचे शिक्षण आणि संस्काराचे दप्तर घेऊन म्हेळुस्के येथील या अभ्यासिकेचे विद्यार्थी एक दिवस जगावर मात करतील हे नक्की..!!
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम