Sandip Jagtap | कवी, प्रदेशाध्यक्ष झालो.. पण याचा माझ्या माय बापाला काय फायदा..?; म्हणून राजीनामा दिला

0
26
Sandip Jagtap
Sandip Jagtap

वैभव पगार – प्रतिनिधी  : म्हेळूस्के |  आमच्या आयुष्याला टाके घालताना स्वतःचे आयुष्य ऊसवलेल्या भाऊ व आक्काने (आई वडीलांनी) अजून देहु – आळंदी बघितली नव्हती. म्हणुन आज त्यांना तिथं घेऊन गेलो. मागच्या रविवारी त्यांना शिवनेरी, ओझर गणपती व लेण्याद्रीला फिरवून आणले. खर म्हणजे माझी आयुष्यात अक्षम्य चूक झाली. मी कर्ता झाल्यावर मी स्वतः महाराष्ट्रभर कवितांच्या कार्यक्रमांना व नंतर शेतकरी संघटनेच्या कामासाठी जिल्हयात व राज्यभर फिरत राहिलो. यात पैसा घालवला. वेळ घालवला. पण आई – वडील चकार शब्दही बोलले नाही.

Sandip Jagtap | संदीप जगताप यांच्या कवितांनी जिंकली अमेरिकेतील मराठी रसिकांची मने

एक दिवस मी विचार केला. या सगळ्यातून मला थोडी प्रसिध्दी मिळाली. थोडे नाव झाले पण याचा माय बापाला काय फायदा..? फक्त कौतुक…? अन् नंतर या वयातही कष्ट..हे सगळ फसवं आहे.. आपण बदलले पाहिजे. म्हणुन प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन आई वडिलांसोबत काही सुंदर क्षण अनुभवण्याचे ठरवले. अर्थात् घरावर तुळशीपत्र ठेवून आम्ही आयुष्य भर फक्त शेतकऱ्यांसाठी लढलो, असं म्हणणाऱ्या महान लोकांएवढा उंचीचा मी कार्यकर्ता नाही.

Sandip Jagtap | नाशिकमधील ‘शेतकरी कवी’ संदीप जगताप यांच्या कविता साता समुद्रापार

इतके दिवस काम करून राज्यभर सोडा मला एका गावात सुद्धा संघटना पोहचवता आली नाही. हे मला माहीत आहे. तरी देखील शेतकऱ्यांसाठीची आपली अगदी छोटी लढाई आपल्या वाणीने व लेखणीने सुरूच राहणार. फक्त सक्रीय चळवळीतून काही दिवस विश्रांती. आई वडिलांसाठी… कारण त्यांनी चालायला शिकवलं..आता पुन्हा मनाने लहान होउन काही पावलं त्यांच्या सोबत चालायची आहे.

तळटीप – आज ही मी आई वडिलांच्याच घरात राहतो.

-संदीप जगताप 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here