Sandip Jagtap | नाशिकमधील ‘शेतकरी कवी’ संदीप जगताप यांच्या कविता साता समुद्रापार

0
23
Sandip Jagtap
Sandip Jagtap

वैभव पगार – प्रतिनिधी : (दिंडोरी) | अमेरिकेतील शिकागो येथील मराठी मंडळाच्या वतीने चिंचखेड (ता. दिंडोरी जि. नाशिक) येथील प्रसिद्ध कवी प्रा. संदीप जगताप यांचे ‘मनातल्या आणि मातीतल्या कविता’ या विषयावर भारतीय वेळेनुसार 10 जुलैला सायंकाळी 6.30 वा. ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले आहे. हा कार्यक्रम शिकागो व अमेरिकेत राहणारी मराठी माणसे ऑनलाईन बघणार आहे. नाशिक जिल्ह्याच्या दृष्टीने साता समुद्रापार संदीप जगताप (Sandip Jagtap) कविता पोहचणार ही अभिमानाची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया अनेक मान्यवरांनी दिली. या कार्यक्रमाचे आयोजन शिकागो येथे राहणारे महाराष्ट्र मंडळाचे समन्वयक माधव गोगावले यांनी केले आहे.

संदीप जगताप यांचा परिचय महाराष्ट्रातील दमदार शेतकरी कवी म्हणून आहेच. तसेच त्यांच्या व्याख्यानाचे कार्यक्रम राज्यभर व राज्याबाहेरदेखील लोकप्रिय आहेत. महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयात होणाऱ्या समारंभामध्ये संदीप जगताप यांच्या कविता व त्यांचे भाषण विद्यार्थी डोक्यावर घेतात. शेतकऱ्यांची वेदना व्यथा मांडणारी कविता व काळजाचा ठाव घेणारी ओघवती निवेदन शैली यामुळे संदीप जगताप अल्पावधीत लोकप्रिय झाले. बेळगावमध्येही नुकतेच तेथील मराठी माणसांनी जगताप यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.(Sandip Jagtap)

Swabhimani | स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी राज्यकार्यकारणी समोर ठेवला राजीनामा

एक बाजूला कविता लेखन व दुसऱ्या बाजूला सक्रिय शेतकरी चळवळीतील सहभाग. आजही शेती करत मातीशी जपलेली नाळ. यामुळे संदीप जगताप यांचे विचार वास्तववादी व तितकेच धारदार बनतात. समाजव्यवस्थेवर त्यांच्या कविता अचूक आसूड ओढतात. त्यामुळे त्यांची व्याख्याने महाराष्ट्रातच नाहीतर महाराष्ट्रबाहेरही गाजतात.

शिकागोतील मराठी माणसांनी अतिशय आत्मीयतेने माझे व्याख्यान आयोजित केले याचा मला निश्चितच आनंद झाला. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात मराठी माणूस राहत असेल. तर त्याच्याशी बोललं पाहिजे. या विचारातून मी या कार्यक्रमाला होकार दिला. शेतकरी चळवळीत काम करताना लेखनाकडे दुर्लक्ष झाले. परंतु मी कवितेची नाळ तुटू दिली नाही. म्हणून निवडक कार्यक्रमाला जात असतो. आज ही लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो व ती प्रेरणा मला लिहतं व बोलतं ठेवते.

– संदीप जगताप

Baramati | मतदानाच्या वेळी स्वाभिमानीला बाजूला का ठेवतात..?; ‘स्वाभिमानी’ करणार नवा एल्गार 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here