वैभव पगार – प्रतिनिधी : दिंडोरी | राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ग्रामविकास गतीविधी प्रणित ग्रामविकास समिती यांच्या पुढाकाराने म्हेळूस्के (ता. दिंडोरी) येथे बायोगॅस प्लांटचे वाटप करण्यात आले. बायोगॅस हा प्रदूषणमुक्त असुन त्यापासून मिळणारे स्लरी हे शेतीसाठी सेंद्रिय खत म्हणून वापरले जाते व केमिकल रहित भाज्यांचे उत्पन्न घेता येते.
तसेच बायोगॅस हा अक्षय ऊर्जेचा स्रोत आहे. त्यामुळे म्हेळूस्के येथील वीस देशी गो-पालकांनी केमिकल रहित शेतीचा संकल्प केला असून ह्या गोपालकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ग्रामविकास गतीविधी व ग्रामविकास समिती म्हेळूस्के यांच्या प्रयत्नाने इंद्राणीबालन फाउंडेशनच्या फंडातून बायोगॅस प्लांट चे वितरण करण्यात आलेले आहे. बायोगॅस लाभार्थींसोबत संघाचे नाशिक विभाग प्रचारक सुमेध देशमुख ,हिंदू जनजागरण मंचचे अतुल पवार, बारामती इको सिस्टीम कँपनी चे अभिमन्यू नागवडे यांनी संवाद साधला. यावेळी ग्रामसमिती सदस्य व गांवकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम