Chandwad | चांदवड विधानसभा युवक काँग्रेस कमिटीतर्फे विधानसभा मतदार संघात पक्ष बांधणीसाठी ‘चलो पंचायत, चलो वार्ड’ हे अभियान तालुक्यातील जोपुळ, भोयगाव, नारायणगाव, सोग्रस, तांगडी या गावांमध्ये राबविण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी एहसान खान, जिल्हाध्यक्ष गौरव पानगव्हाणे, युवा नेते राहुल कोतवाल व चांदवड विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिपांशू जाधव यांनी यावेळी सर्व उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले.
Deola | भावड घाट ते रामेश्वर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु; मात्र, अजूनही शेतकऱ्यांना मोबदला नाही
‘गाव तिथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता’ या अभियानांतर्गत या युवा नेत्यांनी गावांतील स्थानिक युवकांसोबत संवाद साधला. प्रत्येक गावातील समस्या जसे की शिक्षण, रोजगार, आरोग्य व्यवस्था, महागाई, शेतमालाचे कमी झालेले भाव अशा अनेकविध समस्यांवर त्यांनी गावात चर्चा केली. या अभियानात अमित जाधव, सुनील कवात, मयूर ठोंबरे, सचिन गांगुर्डे, स्वप्निल जाधव, संतोष शिंदे, किरण ठाकरे, मधुकर ठोंबरे, पंडित जाधव, कैलास सावकार, पप्पू कोतवाल, दत्तू कोतवाल, अशा असंख्य युवकांनी सहभाग घेतला. यानंतर चांदवड विधानसभा युवक काँग्रेसचे (congress) अध्यक्ष दिपांशू जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.(Chandwad)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम