Igatpuri | मुंबई-नाशिक महामार्गावर अपघातात मृत्यू; दहा दिवस ओलांडूनही आरोपीचा बेपत्ता

0
45
Igatpuri
Igatpuri

राम शिंदे – प्रतिनिधी : सर्वतीर्थ टाकेद |  इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद गावचे भूमिपुत्र दीपक ठकाजी जगताप यांचा बुधवार दिनांक 19 जून रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास मोटारसायकलवर असताना मुंबई-नाशिक महामार्गावर वाडीवऱ्हे पोलीस स्टेशन हद्दीत विल्होळी दरम्यान मोठा अपघात झाला. या अपघातात त्यांचा जागीच अंत झाला.

Igatpuri | नेमकं काय घडलं..?

या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती नुकतीच समोर आली असून,  बुधवार (दि. 19) जून रोजी आपल्या मुलाला पाथर्डी फाटा येथील राहत्या घरातून शाळेत सोडून दीपक जगताप हे आपल्या पत्नीसह गावाकडून मोटारसायकलवर नाशिक मेन ब्रांच अक्सिस बँक येथे मुंबई नाशिक महामार्गावरून जात होते अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून समजली. सकाळच्या दरम्यान नाशिक मुंबई महामार्गावरून प्रवास करत असताना वाडीवऱ्हे पोलीस स्टेशन हद्दीत विल्होळी दरम्यान गाडी चालवत असतांना समोरून अचानक रेड कलरची क्रेन विरुद्ध बाजूने येत होती.

हे बघताच दीपक जगताप यांनी गाडी कंट्रोल केली. त्याच क्षणाला पाठीमागून भरधाव वेगाने येत असलेली मोटारसायकल MH 48 BL 0119 (दिनेश ठोंबरे मु. पो. आडोशी ता.मोखाडा, जि.पालघर) हे पाठीमागच्या बाजूने दीपक जगताप यांच्या मोटारसायकल वर जोरात आदळले. यात त्याच क्षणी समोरून येणारी क्रेनवर दीपक जगताप यांची बाईक जोरात ठोकली गेली व काही क्षणात दीपक जगताप हे गाडीवरून हवेत रस्त्यावर पडले. यात हेल्मेट नसल्याने दीपक जगताप यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला व त्यांच्या पत्नीलाही मोठी दुखापत झाली.

Igatpuri | महाराष्ट्र राज्य शासकीय वसतिगृह रोजंदारी संघटनेचे राज्यव्यापी बिऱ्हाड आंदोलन मुंबईच्या दिशेने

त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीदेखील होत्या. त्या गंभीर जखमी असून, त्यांच्यावर नाशिक येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अपघातात दिनेश ठोंबरे हेदेखील रुग्णालयात उपचार घेत आहेत. या घटनेचा वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अपघातात विरुद्ध दिशेने येत असलेली क्रेन व चालकाचा वाडीवऱ्हे पोलीस शोध घेत आहे. दरम्यान या घटनेने जगताप कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असून एका गरीब घरातील कुटुंबाचा मोठा आधार गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. लवकरच मित्र उमेश बरे आणि मित्र परिवार यांच्याकडून दीपक जगताप यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यात येणार आहे.

मयताचे मोबाईल, पाकीट, ओळखपत्र गायब 

लवकरच संबंधितांवर पुढील योग्य ती कारवाई करून दीपकच्या कुटुंबियाला मदत करण्यात येणार असल्याचे समजते. एका गरीब कुटुंबातील उमदा तरुण जेव्हा अपघातात जातो तेव्हा त्याच्या शवविच्छेदनासाठी देखील त्या कुटुंबाला संघर्ष करावा लागतो व दबावशाली पध्दतीने सदर अपघाताची चुकीची नोंद केल्या जाते व अपघातात दीपक जगताप यांचे मोबाईल, पाकीट, ओळखपत्र गायब होते व दहा दिवस ओलांडूनही या घटनेतील क्रेन चालक सापडत नाही. याचा सर्व समाज बांधवांकडून जाहीर निषेध व्यक्त होत आहे.

Igatpuri | बियाणे, खतांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्रात गर्दी

केवळ अपघात झाल्यानंतर दीपक जगताप यांच्या गळ्यातील ओळखपत्रावर त्यांचे मुंबई मेन ब्रांच axis बँक मित्र परिवार यांचे कडून तात्काळ दखल घेतल्या जाते व त्यानंतर मित्र उमेश बरे व मित्र परिवार तात्काळ घटना स्थळी पोहचतात व पुढील कारवाई होते. सदर अपघातातील काही सीसीटीव्ही फुटेज अपघात करणारी दुचाकीचा फोटो मिळवण्यात आला आहे. सदर अपघातातील मृत दीपक जगताप यांची दुचाकी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात जमा असून या संदर्भात पुढील कारवाई वाडीवऱ्हे पोलीस करत आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here