Igatpuri | महाराष्ट्र राज्य शासकीय वसतिगृह रोजंदारी संघटनेचे राज्यव्यापी बिऱ्हाड आंदोलन मुंबईच्या दिशेने

0
14
Igatpuri
Igatpuri

 इगतपुरी |  महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य रोजंदारी शासकीय आश्रमशाळा वसतिगृह वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचारी संघटना यांचे महाराष्ट्र शासनाकडे राज्यव्यापी बिऱ्हाड महा आंदोलन हे १० जूनपासून सुरू असून या आंदोलनामध्ये कार्यरत रोजंदारी, तासिका वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचारी यांचे धोरणात्मक निर्णय घेऊन थेट विना अट सरसकट समायोजन करावे,रोजंदारी वर्ग ४ कर्मचाऱ्यांचे मृत संवर्गातील पदे तात्काळ जीवित करणे व १६ नोव्हेंबर २०२२ चा सुधारित आकृती बंध रद्द करावा या प्रमुख मागण्या असून नाशिकच्या आदिवासी आयुक्त कार्यालयापासून ते मुंबईच्या दिशेने राज्यभरातील आदिवासी आश्रमशाळातील वस्तीगृह वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचारी संघटनेच्या वतीने शेकडो कर्मचारी लॉन्ग मार्चमध्ये सहभागी झाले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य वर्ग ३ व वर्ग ४ रोजंदारी कर्मचारी संघटना यांनी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने ९ जून रोजी पर्यंत मागण्या पूर्ण न झाल्याने १० जून पासून बिऱ्हाड मोर्चा चे नाशिक आदिवासी आयुक्तलयापासून ते मुंबई मंत्रालय येथे पायी बिऱ्हाड मोर्चाचे संघटनेच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. सदर बिऱ्हाड मोर्चाच्या अनुषंगाने आपल्या आयुक्तालयात माजी आदिवासी विकासमंत्री यांचे समवेत झालेल्या बैठकीत रोजंदारी वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचारी यांच्या बिऱ्हाड मोर्चाच्या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. यात १३ जून रोजी आपल्या आयुक्त लयाने माजी आदिवासी विकासमंत्री यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनुसार काही अटी व शर्ती घालून तात्पुरत्या स्वरूपात हे आंदोलन इगतपुरी भारत पेट्रोलियम येथे तात्पुरते स्थगित करण्यात आले होते.

Igatpuri | बियाणे, खतांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्रात गर्दी

यात वर्ग ४ यांची मृत झालेली पदे पुनर्जीवित करण्यासाठी २६ जून पर्यंत तात्काळ प्रस्ताव वित्त विभागाला सादर करावा व मृत पदे जीवित करावे त्यानंतर वर्ग ३ कर्मचारी यांना बैठकीत ठरल्याप्रमाणे २६ जून पर्यंत वाढीव मानधन व तासिका संख्या वाढीचा अहवाल आयुक्तलयातून सचिव महोदय यांना सादर करावा व धोरणात्मक निर्णय घेऊन सरसकट समायोजनासाठी आवश्यक प्रस्ताव वित्त विभागाला सादर करावा व सरसकट समायोजनासाठी धोरणात्मक निर्णय तात्काळ घ्यावा अश्या मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात येऊन हे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात इगतपुरी येथे स्थगित करण्यात आले होते

त्यानंतर शासनाने या आंदोलनाची दिलेल्या वेळेत कोणतीही दखल न घेतल्याने व कोणतीही मागणी शासनाने पूर्ण न केल्याने हे बिऱ्हाड आंदोलन इगतपुरी घाटनदेवी येथून २७ जून पासून पुन्हा चालू झाले असून इगतपुरीतील घाटनदेवी मंदिरात भर पावसात राज्यभरातील आंदोलन करते कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलन कर्त्यांना न्याय मिळावा व त्यांच्या मागणीला यश यावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. श्रीराम लहामटे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह त्यांची घाटनदेवी मुक्काम स्थळी प्रत्यक्षात जाऊन भेट घेतली व सर्वांची विचारपूस केली.

Igatpuri | अनिता नलगे फौंडेशनच्या वतीने टाकेद येथील वसतिगृहातील विद्यार्थ्यांना कॉट, मेट्रेस वाटप

यावेळी श्रीराम लहामटे यांनी आमदार माणिकराव कोकाटे, आमदार हिरामण खोसकर,आमदार डॉ. किरण लहामटे यांना दूरध्वनी वर संपर्क करून या आंदोलनकर्त्यांना न्याय मिळावा. यासाठी सविस्तर चर्चा करत मागणी केली असता या आंदोलनकर्त्यांचा मुद्दा लवकरच पावसाळी अधिवेशनात मांडणार असल्याची माहिती सर्व आमदार महोदयांकडून मिळाली आहे. तरी हा बिऱ्हाड मोर्चातील आंदोलन करते यांच्याशी डॉ. श्रीराम लहामटे यांनी संवाद साधला असता. त्यावेळी महाराष्ट्र राज्य वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचारी संघटनेच्या राज्य अध्यक्षा योगिता बाली लक्ष्मण पवार, उपाध्यक्ष पंकज बागुल, संपर्क प्रमुख अंकुश चव्हाण, कार्याध्यक्ष पंकज जगताप यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला.

तरी या बिऱ्हाड मोर्चातील कर्मचाऱ्यांना मी स्वतः न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असेल असे आश्वासन डॉ श्रीराम लहामटे यांनी यावेळी व्यक्त केले. जर शासनाने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही. तर हा बिऱ्हाड मोर्चा थेट मुंबई मंत्रालयावर धडकेल व कायम आंदोलन चालूच राहील तरी सरकारने आमची वेळीच दखल घ्यावी. अशी मागणी या संघटनेच्या अध्यक्षा योगिता बाली पवार यांनी यावेंळी केली आहे याप्रसंगी बहुसंख्य महिला माता भगिनींसह बहुसंख्य तरुण कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here