Ladki Bahin Yojna | लाडक्या बहिणींचा त्रास कमी होणार; योजनेचा लाभ घेणे आणखी सोप्पे

0
70
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojna |  राज्यातील महिलांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली असून, यासाठी १ जुलैपासून नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी उत्पन्न आणि वयाची तसेच आणखी काही अटी घालण्यात आल्या होत्या. मात्र, सुरुवातीला पंधराच दिवसांचा अवधी नोंदणीसाठी देण्यात आल्याने महिलांची कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी आणि नोंदणी अर्ज भरण्यासाठी तहसील आणि सेतु कार्यालयांवर एकच झुंबड उडाल्याचे पहायला मिळाले.

यासाठी काल अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी योजनेत काही बदल केल्याची घोषणा केली. यानुसार आता राज्य सरकारने योजना आणखी सोप्पी केली असून, योजनेची नोंदणी मुदतही वाढवण्यात आली आहे. तसेच उत्पन्नाचा दाखला आणि अधिवास प्रमाणपत्रांचीही अट नसून, केवळ रेशनकार्डच्या (Ration card) झेरॉक्सची पूर्तता केली जाणार आहे. (Ladki Bahin Yojna)

उत्पन्नाचा दाखला आणि अधिवास प्रमाणपत्र घेण्यासाठी आणि नोंदणी अर्ज भरण्यासाठी महिलांनी १ तारखेपासूनच तालुक्यातील सेतू, तलाठी आणि तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे मंगळवारी राज्य सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आणि योजनेचा लाभ घेणीसाठी महिलांना प्रक्रिया आणखी सोपी करून दिली.

Ladki Bahin Yojna | महाराष्ट्रातील महिलांना मिळणार प्रतिमाह १,५०० रुपये; तीन गॅस सिलिंडर मोफत 

Ladki Bahin Yojna |  योजनेत नेमके काय बदल..?

  1. अर्ज करण्यासाठी मुदतवाढ – ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार
  2. ५ एकर शेतीची अट वगळण्यात आली
  3. २१ ते ६५ वर्ष वयोगटातील महिला घेऊ शकणार लाभ
  4. परराज्यातील महिलांनी महाराष्ट्रातील पुरुषासोबत विवाह केला असल्यास पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल
  5. उत्पन्न दाखला उपलब्ध नसल्यास पिवळे व केशरी रेशनकार्ड ग्राह्य धरले जाईल
  6. कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेलाही लाभ घेता येणार (Ladki Bahin Yojna)

Ladki Bahin Yojana | ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार..?; वाच सविस्तर माहिती

नोंदणीची मुदत वाढवली 

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ही सुरुवतीला १ जुलै ते १५ जुलै पर्यंत ठेवण्यात आली होती. मात्र, आता ही मुदत वाढवण्यात आली असून, ३१ ऑगस्टपर्यंत महिलांना नोंदणी अर्ज भरता येणार आहे. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येईल. तसेच वयाची अटही वाढवून आता ६५ वर्षांपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे २१ ते ६५ वर्षांपर्यंतच्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे.

याबाबत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव सुजाता सौनिक हे उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. (Ladki Bahin Yojna)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here