Hathras | बस अन् टेम्पोमध्ये भरुन मृतदेह रुग्णालयात; मृतदेहांचा खच पाहून पोलिसाला हार्ट अटॅक

0
35
Hathras
Hathras

हाथरस:   मंगळवार (दि. २ जुलै) रोजी उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एक मोठी दुर्घटना घडली. ज्यात तब्बल १२१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हाथरसमध्ये भोले बाबाच्या सत्संगानंतर चेंगराचेंगरी झाली आणि यात अनेक भाविकांना नाहक जीव गमावला आहे. दरम्यान, या घटनेतील मृतांचे मृतदेह चक्क बस आणि टेम्पोमध्ये भरुन सिंकदराऊ सीएचसी आणि एटा जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. एवढा मृतदेहांचा खच पाहून एटा मेडिकल कॉलेज येथे कर्तव्यावर असलेल्या पोलिस शिपायाला हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला.

Hathras | का झाली चेंगराचेंगरी; नेमकं काय घडलं..?

उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यातील मुगलगढी या गावात भोले बाबा नामक एका व्यक्तीच्या सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. येथील लोक भोले बाबाला खूप मानतात. त्यामुळे त्यांचे सत्संग एकण्यासाठी लाखोच्या संख्येने लोकांना या ठिकाणी गर्दी केली होती. दरम्यान, जेव्हा सत्संग संपले आणि या भोले बाबाची गाडी बाहेर पडली. त्यानंतर त्याच्या पायाखालची माती घेण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली आणि येथे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. (Hathras)

यात काही लोक खाली पडले आणि त्यांच्यावरून इतर लोक गेले. या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत १२१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, हा मृतांचा आकडा आणखीही वाढण्याची शक्यता आहे. तर, ज्याचे सत्संग ऐकण्यासाठी लोक जमा झाले होते. तो भोले बाबा या घटनेनंतर फरार झाला असून, पोलिसांनी सत्संगाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल केले आहेत.

Nashik Crime News | नाशिकमध्ये काम सांगितल्याच्या रागातून वेटरचा हॉटेल चालकावर कोयत्याने हल्ला

मृतदेहांचा खच पाहून पोलिसाला हार्ट अटॅक

या घटनेतील मृतांचे मृतदेह हे बस आणि टेम्पोमधून रुग्णालयात आले असता. या ठिकाणी अलीगड येथील रहिवासी पोलिस शिपाई रवी यादव हे कर्तव्यावर होते. मृतदेहांची व्यवस्था करण्यासाठी काम रवी यादव यांची ड्युटी होती. तो सर्व मृतदेहांचा खच पाहून ड्युटीवर असलेले पोलिस शिपाई रवी यादव यांचा तीव्र हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. (Hathras)

दरम्यान, या घटनेबाबत एटा रुग्णालयाचे एसपी राजेश कुमार सिंह यांनी सांगितले की, “हाथरस जिल्ह्यातील मुगलगढी गावात एक धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अचानक चेंगराचेंगरी झाली आणि यात १२१ भविकांचा मृत्यू झाला असून, त्यांचे मृतदेह एटा रुग्णालयात आणले आहेत. यात अनेक महिला व लहान मुलांचेही मृतदेह होते. या सर्व मृतदेहांची ओळख पटवली जात आहे.

West Bengal Train Accident | भीषण रेल्वे दुर्घटना..! मालगाडी आणि एक्स्प्रेस रेल्वेची धडक अनेक प्रवासी जखमी


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here