Avishkar Bhuse | कार्यकर्ते भावनिक भाईजी लोकसभा लढवाच

0
33
Avishkar Bhuse
Avishkar Bhuse

Avishkar Bhuse |  राज्यात आगामी लोकसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली असून, काल भाजपने महाराष्ट्रातील २० जागांवरील उमेदवारांची घोषणा केली. यात धुळे लोकसभेच्या उमेदवारांचाही समावेश आहे. तर, या जागेवर भाजपने विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांनाच पुन्हा संधी दिली आहे. विद्यमान खासदार सुभाष भामरे यांना या मतदार संघातून तिसऱ्यांदा हॅटट्रिक करायची इच्छा असून, त्यांची ही इच्छा भाजपने पूर्ण केली आहे. (Avishkar Bhuse)

मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून ही जागा शिवसेनेकडे येईल आणि येथून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांचे चिरंजीव अविष्कार भुसे हे निवडणूक लढवतील, अशी चर्चा रंगली होती. यासाठी युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडूनही जोरदार तयारीही सुरू होती. कार्यकर्त्यांनी आणि मतदार संघातील तरुणांनी त्यांच्या उमेदवारीची मागणीही केली होती. मात्र, आविष्कार भुसे यांना ही उमेदवारी मिळू शकली नसल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांच्यावर प्रेम करणारे मतदार संघातील तरुण हे भावनिक झाले असून, त्यांच्याकडून आविष्कार भुसे यांना अपक्ष निवडणूक लढवण्याची विनंती केली आहे. (Avishkar Bhuse)

Dhule Loksabha | धुळे लोकसभेतील इच्छुकांच्या गर्दीत अविष्कार भुसे ठरताय लोकप्रिय…

Avishkar Bhuse | कार्यकर्ते भावनिक… 

अविष्कार बुसे यांना उमेदवारी न दिल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांचा मोठा हिरमोड झाला असून, कार्यकर्ते भावनिक झाले आहेत. एवढेच नाहीतर तरुणांकडून त्यांना अपक्ष निवडणूक लढवण्याची मागणीही केली जात आहे. एका तरुणाने पत्राद्वारे आविष्कार भुसे यांना धुळे लोकसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे. अविष्कार भुसे हे येथील तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले असून, मतदार संघात त्यांच्या चाहता वर्ग मोठा आहे. अगदी २४ तास ते मतदार संघातील जनतेसाठी उपलब्ध असतात. त्यांच्या मदतीला धाऊन जातात. एक नम्र पण तडफदार नेतृत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या दिलदार स्वभावामुळे त्यांनी मतदार संघात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. (Avishkar Bhuse)

Dhule Loksabha | जनतेच ठरल…!, मालेगावचे ‘भाईजी’ दिल्लीत पाठवणार.!

जीवाचं रान करू, पण युवकांचा आवाज दिल्लीत पाठवूच

गेल्या काही दिवसांपासून धुळे लोकसभा या मतदार संघात धडाडीचे नेतृत्व म्हणून अविष्कार भुसे यांच्याकडे पहिले जाते. युवकांचा आवाज आपणच दिल्लीपर्यंत पोहचवू शकतात. धुळे लोकसभा मतदार संघात आपली चांगली छाप आहे. तरी, आपण धुळे लोकसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून उमेदवारी करावी. आम्ही जीवाचं रान करू, पण युवकांचा आवाज हा दिल्लीत पाठवूच, अशी मागणी तरूणांकडून केली जात आहे. (Avishkar Bhuse)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here