Nashik | उन्हाच्या वाढत्या तडाख्याने बुधवारच्या आठवडे बाजारातून पालेभाज्या कमी झालेल्या आहेत. पालक, शेपू काही प्रमाणात उपलब्ध आहेत तरीही मेथीची जुडी दुर्मिळ झाल्याचे चित्र पहायला मिळाले. त्याच कारणांमुळे सर्वसामान्यांना मेथीच्या जुडीसाठी चक्क पन्नास रुपये मोजावे लागत होते. कांद्याच्या दरानेही तेजी गाठली असून चांगल्या प्रतीच्या किलोभर कांद्यासाठी 50 ते 60 रुपये मोजावे लागले. त्यामुळे आगामी काळात गृहिणींचे बजेट कोसळणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
PM Modi | पंतप्रधान मोदींचा आज शिर्डी दौरा; दुपारी अर्ध्या तासासाठी मंदिर बंद
नवरात्रोत्सवात अनेक महिला नऊ दिवसांचे उपवास करत असतात, त्यामुळे या काळात भाज्यांचे दर कमी होतात. मात्र उन्हाच्या वाढत्या तडाख्याने पालेभाज्यांसह सर्वच प्रकारच्या भाज्यांच्या आवकमध्ये मोठी घट झालेली आहे. परंतु भाज्यांना मागणी अधिक असल्याने भावांमध्ये तेजी आलेली आहे.
Maharashtra| ८६ लाख शेतकऱ्यांना १,७२० कोटींचे उद्या होणार वितरण…
नाशिकच्या आठवडे बाजारात भेंडी 60 रुपये, तर गवार 100 ते 120 रुपये किलो आहे. फ्लॉवर 20 ते 30 रुपये, तर कोबी गड्डा 15 ते 20 रूपयांत मिळत होता. हिरव्या मिरच्याही 80 ते 100 रुपये किलो दराने उपलब्ध होत्या. याशिवाय पालक आणि शेपूच्या जुड्या 20 रूपयांत मिळत होत्या. परतीच्या पावसाने नाशिक जिल्ह्यातील अनेक भागातील कांदा चाळींचे मोठे नुकसान झालेले आहे. अनेक भागातील शेतकऱ्यांच्या चाळीतील निम्म्यापेक्षा अधिक कांदा खराब झालेला आहे. त्यामुळे कांद्याच्या दरांत तेजी पहायला मिळत आहे. चांगल्या दर्जाच्या किलोभर कांद्यासाठी आठवडे बाजारात 50 ते 60 रुपये मोजावे लागत होते. तर लाल कांद्याला विशेष मागणी नव्हती तरीही कांद्याला 30 रुपये किलो दर मिळत होता.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम