Skip to content

Baba Maharaj Satarkar| वारकरी संप्रदाय हळहळला; बाबा महाराज सातारकर यांचं निधन…


 Baba Maharaj Satarkar|   महाराष्ट्रातील ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं  वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झालं. नवी मुंबईच्या नेरूळ येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या  संध्याकाळी ५ वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. बाबा माहाराज सातारकर यांचे पार्थिव आज दुपारी तीन वाजेनंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखाना समोरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदीरात ठेवण्यात येईल.

जेष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांनी आपलं सबंध आयुष्य हे अध्यात्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी अर्पण केलं. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सामान्यांचे प्रबोधन केले.

 यावर्षीच फेब्रुवारी महिन्यात बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रूक्मिणी सातारकर ऊर्फ माई यांचं निधन झालं होतं. त्यानंतर ८ महिन्यांतच बाबा महाराज सातारकर यांनीही आज अखेरचा श्वास घेतला आहे.

विठोबा-ज्ञानोबासाठी आयुष्य

ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९३६ रोजी सातारा जिल्ह्यात झाला. त्यांनी तेव्हाच्या काळात दहावीपर्यंत इंग्रजी माध्यमातून शिक्षण  घेतलं होतं. बाबा महाराज सातारकर यांच्या घरातही शेकडो वर्षांपासून वारकरी सांप्रदायाची परंपरा सुरु आहे. विठुरायाचे कीर्तन तसेच ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी याचा प्रचार प्रसार करण्यासाठी बाबा महाराजांनी आपल संपूर्ण आयुष्य अर्पण केलं. त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक जमत होते. पण, आता वय झाल्यामुळे बाबा महाराज हे कीर्तनासाठी उभे रहात नव्हते. पण, त्यांची ही परंपरा त्यांचा नातू पुढे नेत आहे.

PM Modi | पंतप्रधान मोदींचा आज शिर्डी दौरा; दुपारी अर्ध्या तासासाठी मंदिर बंद

जीवन परिचय

नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे म्हणजेच ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकरांच्या घरात अनेक पिढ्यांपासून कीर्तनाची व प्रवचनाची परंपरा जोपासली जात होती. आणि तीच परंपरा बाबा महाराजांनी पुढे सुरू ठेवली. बाबा महाराजांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे मृदूंगवादक होते. त्यांच्या आई लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची खूप आवड होती. त्यांचे चूलते आप्पामहाराज व अण्णामहाराज यांच्याकडूनच बाबा महाराजांनी कीर्तनाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून १० वी पर्यंतचं शिक्षण घेतलं होतं. वयाच्या आठव्या वर्षांपासूनच बाबा महाराज कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणायचे. तिथूनच त्यांच्यावर वारकरी संप्रदायाचे संस्कार रुजत गेले. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी पुरोहितबुवा, तसेच आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!