बोधीवृक्ष ही नाशिककरांसाठी गौरवाची बाब; भुजबळांनी केल्या भावना व्यक्त

0
31

Nashik | लोकांच्या हृदयात दयाभाव, करूणा निर्माण करण्यात बौद्धांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. गौतम बुद्धांची शिकवण आणि विचार आजही तितकेच प्रेरक असून प्रत्येकाने ते विचार स्वतः आत्मसाद करून समाजात रुजविण्यासाठी प्रयत्न करायला हवे. आज जगात विविध देशांमध्ये युद्ध सुरू आहेत. अशावेळी भगवान गौतम बुद्धांचे विचार जगात शांतता निर्माण करून या जगाला वाचवू शकतात असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे.

महाराष्ट्र शासन व शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नाशिकच्या बुद्ध स्मारक त्रिरश्मी बुद्ध लेणी येथे ऐतिहासिक महाबोधी वृक्ष रोपण सोहळा पार पडला. या आयोजित सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्यास श्रीलंका येथील बोधीवृक्षाचे प्रमुख पूज्यनीय हेमरत्न नायक थेरो, श्रीलंकेचे केंद्रीय बुद्धा शासन धार्मिक आणि सांस्कृतिक कार्य मंत्री विदुर विक्रमनायक, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार, पालकमंत्री दादाजी भुसे, मंत्री गिरीश महाजन,श्रीलंका येथील महिंदावस थेरो पूज्यनीय भिक्खू डॉ.वास्कडूवे, मलेशिया येथील महाथेरो संघराजा पूज्यनीय भिक्खू सरणांकर, श्रीलंका येथील आनंदा नायके थेरो पूज्यनीय भिक्खू नाराणपणावे, पूज्यनीय भिक्खू डॉ.पोंचाय, महाराष्ट्र भिक्खू संघ सल्लागार प्रा.डॉ.भदन्त खेमधम्मो महास्थवीर,आमदार राहुल ढिकले, आमदार प्रा.देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्टचे पूज्य भिक्खू सुगत थेरो, पूज्य भिक्खू संघरत्न थेरो, जिल्हाधिकारी जलज शर्मा, प्रशासक तथा मनपा आयुक्त अशोक करंजकर, बार्टी महासंचालक सुनिल वारे,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे,समन्वयक आनंद सोनवणे,शहराध्यक्ष रंजन ठाकरे, बाळासाहेब कर्डक, प्रकाश लोंढे, संजय खैरनार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

‘छाताडावर बसणार पण आरक्षण नाही सोडणार’; मनोज जरांगेंचा निर्धार

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, दसऱ्याला आपण आपट्याची पान वाटून सोन लुटत असतो आज मात्र आपण भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचं सोनं लुटण्यासाठी येथे आलो आहोत. नाशिक शहराला धार्मिक अस महत्व असून जगभरातील लोक येथे येत असतात. आता बोधीवृक्ष ही नाशिक आणि महाराष्ट्राला मिळालेली अमूल्य अशी भेट असून जागतिक स्थरावर नाशिकच्या वैभवात अधिक भर पडणार आहे. यामुळे नाशिकच्या पर्यटनात मोठी वाढ होऊन या स्थळाला जागतिक महत्त्व प्राप्त होणार आहे. यापुढील काळात या वृक्षाचे संरक्षण करून परिसराचा विकास करण्याची जबाबदारी आपली आहे. अगदी लहान बाळाप्रमाणे याची काळजी घेऊन या झाडाची वाढ करण्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे. याठिकाणी मंजूर करण्यात आलेल्या निधीतून भिक्खू निवास यासह विविध विकासकामे करण्यात येतील. तसेच यापुढील काळातही विकासाची अनेक कामे करण्यात येतील असे भुजबळांनी यावेळी सांगितले.

ब्रेकींग | राणेंची राजकारणातून ‘एक्झिट’

ते म्हणाले की, महाबोधी हे एक पवित्र वृक्ष आहे. हा गौतम बुद्धाचा सर्वात जवळचा अस्सल जिवंत दुवा आहे. महाबोधीवृक्ष हा ज्ञानाचा वृक्ष आहे. सुमारे २६०० वर्षांपूर्वी, भगवान गौतम बुद्ध भारतातील बोधगया बिहार येथे निरंजना नदीच्या काठावर असलेल्या इसाथु वृक्षासमोर पाठीशी बसले होते. या क्षणी, जेव्हा ते झाडाच्या विरूद्ध बसले, तेव्हा बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले. ते बोधीवृक्ष म्हणून ओळखले जाऊ लागले आणि बुद्धाच्या हयातीतही यात्रेकरू ते पाहण्यासाठी आले येत होते. त्यानंतर, बौद्ध संघमित्रा महाथेरी यांना सम्राट अशोकाने भारतातून श्रीलंकेत पाठवले. अशोकांची कन्या संघमित्रा हिने या बोधिवृक्षाची एक फांदी श्रीलंकेत नेली व तेथील अनुराधापुरा येथील रॉयल पार्कमध्ये बोधी वृक्षाची शाखा लावली. ते महाबोधी वृक्ष नावाने ओळखले जाते. तेव्हापासून बौद्ध भिक्षू आणि समर्पित राजांनी त्यांची काळजी घेतली आणि संरक्षित केली. आज या महाबोधी वृक्षाच्या फांदीचे आपल्या नाशिकमध्ये रोपण करण्यात येत आहे. ही नाशिककरांसाठी गौरवाची बाब असल्याचे यावेळी भुजबळ‍ म्हणाले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here