Dashara melava: मी अंगार भंगार नाय र…;पालकमंत्री गोट्या खेळताय का ? सुषमा अंधारे कडाडल्या

0
10

Dashara melava: नाशिकचे ड्रग्स प्रकरण यंदाच्या दासऱ्या मेळाव्यात चांगलच गाजले. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी यावरून नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे यांना चांगलेच धारेवर धरले आहे. अंबादास दानवे यांच्या भाषणानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांंनी भाषणाला सुरुवात केली.

त्या म्हणाल्या की मी महाराष्ट्राच्या हिताची भूमिका मांडत आहे. आपला महाराष्ट्र ड्रग्जमुक्त, नशामुक्त झाला पाहिजे ही माझी भावना आहे. खर म्हणजे आज सद्गुणांनी दुर्गुणांवर मात करण्याचा दिवस आहे. महाराष्ट्र ही अध्यात्मिक साधू सतांची भूमी आहे. महाराष्ट्र उडता पंजाब होऊ नये म्हणून आम्ही सातत्याने भूमिका मांडतोय, असं सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या.

बोधीवृक्ष ही नाशिककरांसाठी गौरवाची बाब; भुजबळांनी केल्या भावना व्यक्त

अंधारे यांचा मोठा गौप्यस्फोट

अंधारे यांनी मोठा गौप्य स्फोट केला असून नाशिकला एवढा शेकडो कोटींचा ड्रग्जचा साठा मिळतो तर नाशिकचा पालकमंत्री गोट्या खेळतोय का? असा सणसणीत सवाल यावेळी अंधारे यांनी केला आहे. एका बाजूला मला नोटीस पाठवायची भाषा करणारे लोक माझ्याशी मांडवली करण्याचा प्रयत्न करतात,  असा धक्कादायक गौप्यस्पोट अंधारे यांनी केल्याने पुन्हा राजकारण तापणार असल्याचे चित्र आहे.

देवेंद्र फडणवीस कसले चाणक्य

अंधारे म्हणाल्या की फडणवीस यांना चाणक्य म्हटले जाते पण ते मला ती अतिशययोक्ती वाटते चाणक्य माणसं घडवतात तुम्ही कोणाला घडवताय तुम्ही माणसं संपवत आहेत असे म्हणत सुषमा अंधारे यांनी हल्लाबोल  केला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here