ब्रेकींग | राणेंची राजकारणातून ‘एक्झिट’

0
21

Mumbai | माजी खासदार आणि नारायण राणे यांचे सुपुत्र नीलेश राणे यांनी आज दसऱ्याच्या दिवशी तडकाफडकी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. एक्सवरुन त्यांनी एक याबाबतची पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये नीलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे कारणही स्पष्ट केलेले आहे. मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही, असेही निलेश राणे यांनी म्हटले आहे. निलेश राणे यांनी अशाप्रकारे तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात मोठा गौप्य स्फोट झाला आहे. निलेश राणेंच्या या ट्विटनंतर राजकीय चर्चांना उधाण आलेले आहे. (ब्रेकींग)

Pankaja Munde| पैसे देऊन निवडून येणाऱ्यांना मी पाडेन – पंकजा मुंडे

निलेश राणे नक्की काय म्हणाले?

नमस्कार,

मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही.

मागच्या १९/२० वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे.

मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.

तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा.

जय महाराष्ट्र!

अशा आशयाचं ट्विट करत निलेश राणेंनी राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा केलेली आहे. निलेश राणेंच्या ह्या एक्झीटच्या मागे नक्की कारण आहे? याविषयी राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here