Skip to content

Pankaja Munde |“तुम्ही माझी माणसं आहात की माझे शत्रू आहात?”,पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर भडकल्या.


Pankaja Munde | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची आज दसरा मेळाव्यानिमित्त बीडमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना पंकजा मुंडे स्वतःच्याच कार्यकर्त्यांवर भडकलेचे बघायला मिळाले. “तुम्ही माझी माणसं आहात की माझे शत्रू आहात?”, असं पंकजा यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून विचारले. भाजप नेत्या पंकज मुंडे यांची आज सावरगाव येथे भगवान बाबा गडावर दसरा मेळाव्याची सभा झाली. त्यांच्या ह्या सभेनिमित्त शेकडो कार्यकर्त्यांनी याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. पंकजा मुंडे यांचं हे भाषण जवळपास एक तास सुरू होतं. यात भाषण सुरु असताना काही तांत्रिक अडचणींमुळे माईक बंद पडला. विशेष म्हणजे सभेत कार्यकर्त्यांकडून सुरु असलेली घोषणाबाजी ही पंकजा मुंडे यांच्यासाठीच डोकेदुखी ठरली. त्यामुळे त्या त्यांच्या कार्यकर्त्यांवर चांगल्याच संतापल्या होत्या.

पंकजा मुंडे सभेच्या ठिकाणी आल्यापासूनच कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात होती. तर काही कार्यकर्ते उभे होते. पंकजा यांनी सुरुवातीला कार्यकर्त्यांना नम्रपणे खाली बसण्याची व शांत होण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं. पण कार्यकर्ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे पंकजा यांना कार्यकर्त्यांचा राग आला व त्यांनी कार्यकर्त्यांना चांगलेच सुनावले.

ब्रेकींग | राणेंची राजकारणातून ‘एक्झिट’

‘तुम्ही माझी माणसं असूच शकत नाही’

“माझं छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात स्वागत केलं. सर्व समाजाच्या बांधवांनी याठिकाणी माझं स्वागत केलं. ऊसतोड कामगारांच्या प्रतिनिधींनी स्वागत केलं. मी सर्वांचे मनापासून आभार मानते”, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. “तुम्ही का आलात? हे मला सांगा. मला कुठलं पद मिळालं म्हणून आलात? मला कुठली खुर्ची मिळाली म्हणून आलात? माझ्यासाठी आलात, की भगवान बाबासाठी आलात? मी तुम्हालाअसं काय दिलंय?”, असे भावनिक प्रश्न पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना  विचारले.

पंकजा मुंडे यांचे भाषण सुरु होऊन पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ झाला होता. पण तरीही कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजीचा आवाज सुरुच होता. त्यामुळे पंकजा यांनी कार्यकर्त्यांवर संताप व्यक्त केला. “तुम्ही माझी माणसं आहात का? की माझे शत्रू आहात? नाही. तुम्ही माझी माणसं नाहीत. राजकारण मी करावं ? की सोडून द्यावं? मग तुम्ही माझी माणसं असाल तर खाली बसा. हाताची घडी करा आणि खाली बसा. आणि जो कोणी घोषणा देईल त्यालाही खाली बसवा. नंतर त्याला के ते बाकी बघून घ्या”, असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. आणि त्यानंतर अखेर कार्यकर्ते शांत झाले.

Pankaja Munde| पैसे देऊन निवडून येणाऱ्यांना मी पाडेन – पंकजा मुंडे

 मानले कार्यकर्त्यांचे आभार… 

“माझी शिवशक्ती परिक्रमा सुरू होती तेव्हा मला वाटलं नव्हतं की तुम्ही मला एवढं प्रेम द्याल. माझ्या कारखान्यावर रेड पडली तेव्हा दोन दिवसांत ११ कोटी रुपये तुम्ही जमा केले होते. अहो तुम्हाला बसायला मला साधी सतरंजी सुद्धा अंथरता येत नाहीये. की, तुम्हाला काही खाऊ घालता येत नाही. आणि तुम्ही उन्हात बसलाय म्हणून स्टेजवरच्यांनाही मी उन्हात ठेवलंय आणि मी सुद्धा उन्हात उभी आहे. कारण माझी माणसं उन्हात असतील तर सत्तेच्या खुर्चीवर आणि सावलीत बसण्याचं रक्त गोपीनाथ मुंडेंचं असूच शकत नाही”, असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.“एकवेळ मला काहीही देऊ नका. पण माझ्या माणसांना त्यांच्या हक्कांपासून दूर तुम्ही ठेऊ शकत नाही. ज्यांना पदं दिली असतील ते माझ्यापासून दूर जाऊ शकतात. पण ही माझी जनता माझ्यापासून दूर जाऊ शकत नाही. हारने का मतलब, गिरने का मतलब, नजरों से गिरना है, खुर्ची से नहीं”, असं म्हणत पंकज यांनी आजच्या ह्या भाषणातून २०२४ मध्ये स्वतः निवडणुकांच्या मैदानात उतरणार असल्याचा एल्गारही पंकज यांनी यावेळी केला आहे.

Dada Bhuse| दादा भुसेंनी धाडली सुषमा अंधारेंना नोटिस…


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!