Nashik News | नाशिकच्या नावे विश्वविक्रम; शिवरायांची १७ हजार चौरस फुटांची ‘ग्रंथरांगोळी’

0
20

Nashik News |   कर्मवीर अॅड. बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची १७ हजार चौरस फुटांची विश्वविक्रमी ग्रंथांची रांगोळी साकारली आहे. ह्या उपक्रमाचा उद्‍घाटन सोहळा हा सोमवार (दि. २७) रोजी पार पडला. या सोहळ्यासाठी अभिनेते मिलिंद गुणाजी यांची प्रमुख उपस्थिती होती. मविप्र संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे हे प्रमुख पाहुणे होते.

यावेळी छत्रपती शिवराय शिष्यवृत्तीची घोषणा आणि श्रीकांत देशमुख लिखित ‘कुळवाडीभूषण शिवराय’ ह्या ग्रंथाच्या पाचव्या जनआवृत्तीचे लोकार्पणही करण्यात आले. ह्या ठिकाणी ग्रंथ रांगोळी तसेच लहान मुलांनी साकारलेले किल्ले, व शिवकालीन वस्तूंचे प्रदर्शनही भरवण्यात आले आहे. ह्या विश्वविक्रमी ग्रंथ रांगोळीत श्रीकांत देशमुख लिखित ‘कुळवाडीभूषण शिवराय’ ह्या ग्रंथाच्या ७५ हजार प्रति वापरण्यात आल्या आहेत.

या उपक्रमानंतर या प्रतींचे विद्यार्थ्यांना मोफत वाटप केले जाणार असून, ह्या पुस्तकावर आधारित परीक्षाही घेतली जाणार आहे. या परीक्षेत पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना मविप्र संस्थेतर्फे ‘छत्रपती शिवराय शिष्यवृत्ती’ ही दिली जाणार असल्याची घोषणा संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी यावे आपल्या भाषणातून केली. शिष्यवृत्तीची रक्कम ही दहा हजार रुपये असेल, असेही त्यांनी नमूद केले.

Info-Tech News | Jio-Airtel नाही तर ‘ह्या’ कंपनीने लाँच केला आहे २३ रुपयांचा रिचार्ज

यावेळी डॉ. भास्कर ढोके यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विश्वासराव मोरे यांनी आभार मानले. तर, डॉ. तुषार पाटील यांनी ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या वेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह वसंत गिते, शिवाजी चुंभळे, समीर वाघ, तसेच संस्थेचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

नाशिककरांना अनुभवता येणार शिवरायांचे भव्य रूप

१ डिसेंबरपर्यंत संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत कर्मवीर अॅड. बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात ह्या अभिनव उपक्रमाचा नाशिककरांना आस्वाद घेता येणार आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

शिवरायांच्या भव्य ग्रंथ रांगोळीचे वर्ल्ड रेकॉर्ड

मविप्र संस्थेतर्फे ७५ हजार पुस्तकांचा वापर करून १५२ फूट लांब, आणि ११२ फूट रुंद या आकाराची एकूण १७ हजार चौरस फुटात छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र हे साकारण्यात आले आहे. यासाठी पुस्तकाच्या मुखपृष्ठाची विविध १३ रंगात छपाई करण्यात आली आहे.

दरम्यान, मविप्र संस्थेच्या ह्या उपक्रमाची लंडन येथील ‘वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्यात आलेली आहे. वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या पश्चिम भारत परीक्षक अमी छेडा यांनी ह्या विक्रमाचे प्रमाणपत्र मविप्र संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांना हस्तांतरित केले.

Crime News | प्रेयसीला पळवून नेत प्रियकराचा लग्नास नकार; नंतर तरुणीचं धक्कादायक कृत्य


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here