Skip to content

नाशिक | बापाचं धक्कादायक कृत्य; पोटच्या पोराची सुपारी देऊन हत्या


नाशिक | जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात असलेल्या लोखंडेवाडी शिवारात, पालखेड धरणाच्या भराव परिसरात दि. २२ नोव्हेंबर रोजी एक मृतदेह आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच वणी पोलिस घटनास्थळी दाखल झालेले होते. हा मृतदेह किशोर उर्फ टिल्लु दगु उशीर (वय २६, ता. चांदवड) याचा असल्याचं निष्पन्न झालेलं होतं.

Info-Tech News | Jio-Airtel नाही तर ‘ह्या’ कंपनीने लाँच केला आहे २३ रुपयांचा रिचार्ज

मृतदेहाच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि शरीराच्या अन्य भागावर अज्ञात हत्याराने गंभीर वार करुन किशोरला ठार करण्यात आले होते. याप्रकरणी मयताचे नातेवाईक सुरेश सुधाकर कांडेकर (रा. खडकजांब, ता. चांदवड) यांनी वणी पोलिसांत तक्रार दाखल केलेली होती. याप्रकरणी पोलिस तपास करत असताना पोलिस तपासात एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. या तपासात पित्यानेच मुलाची सुपारी देऊन हत्या केल्याचं उघड झालेलं आहे.

Crime News | प्रेयसीला पळवून नेत प्रियकराचा लग्नास नकार; नंतर तरुणीचं धक्कादायक कृत्य

निर्जनस्थळी हत्या झाल्यामुळे कुठलाही साक्षीदार नसताना तपास करणे पोलिसांसमोर मोठे आवाहन होते. मात्र गोपणीय आणि तांत्रिक दृष्ट्या तपास करत पोलिसांनी याप्रकरणी संशयित संदीप छगन गायकवाड (वय ३०) आणि त्याचा अल्पवयीन एक १६ वर्षीय साथीदार यास ताब्यात घेतलेले आहे. यावेळी हत्येच्या हेतूने तपास करत असताना संदीप यास पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खून केल्याची कबुलीदेखील दिली आहे.

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!