Crime News | प्रेयसीला पळवून नेत प्रियकराचा लग्नास नकार; नंतर तरुणीचं धक्कादायक कृत्य

0
14

Crime News | अनेक दिवसांपासुन राज्यात धक्कादायक घटना घडत आहेत. प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीने टोकाचा निर्णय घेतलेला आहे. या घटनेने संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करत प्रियकरावर गुन्हा दाखल केलेला आहे.

Uttarkashi Tunnel Rescue | आज १७ दिवसांनी बोगद्यात अडकलेले ४१ मजूर बाहेर येणार

पुण्यातील ऊरळी देवाची येथे शुक्रवारी (दि. 24) नोव्हेंबर रोजी सकाळी एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आलेली आहे. प्रतिक्षा दत्तात्रेय भगत (वय १९) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी प्रियकर आदित्य अशोक जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आदित्य आणि प्रतिक्षा दोघेही एकाच गावातील रहिवाशी आहेत. दोघांचीही मैत्री होती त्यातून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. प्रतिक्षा त्याच्यासोबत लग्नाची स्वप्न रंगवू लागली होती मात्र, आदित्याच्या मनात दुसरेच होते.

विवाहाच्या आमिषाने प्रतिक्षाला घेऊन आदित्य गावातून पसार झाला होता. त्यानंतर प्रतिक्षाने त्याला लग्नाबाबत विचारणा केलेली होती. तेव्हा त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली. परंतु प्रतिक्षा सातत्याने त्याच्या मागे लग्नाचा तगादा लावत होती. तेव्हा त्याने लग्नासाठी नकार दिला. आदित्यने घरातून पळवून आणल्यानंतर लग्नाला नकार दिल्याने प्रतिक्षा कोलमडली. त्यानंतरदेखील तिने आदित्यला समजवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने मी तुझ्याशी लग्न करणार नाही. तुला जे करायचे ते कर, असं तिला म्हणाला होता.

Malegaon | अद्वय हिरेंना जामीन नाहीच; कोठडीत आणखी वाढ

आदित्यने लग्नाला नकार दिल्याने नैराश्यात गेलेल्या प्रतिक्षाने मानसिक त्रास सहन न झाल्याने हडपसर-सासवड रस्त्यावरील उरुळी देवाची परिसरात राहणाऱ्या मामाच्या घरी गळफास घेत आत्महत्या केलेली आहे. उरुळी देवाचीमध्ये शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी प्रेयसीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रियकरावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिस पुढिल अधिक तपास करत आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here