Uttarkashi Tunnel Rescue | उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील बोगद्यात अडकलेल्या मजुरांची अखेर आज सुटका होत आहे. तेथील रेस्क्यू ऑपरेशनचं काम हे अंतिम टप्प्यात आलं आहे. गेल्या १२ नोव्हेंबरपासून म्हणजेच मागील १७ दिवसांपासून ४१ मजूर हे बोगद्यात अडकले होते.
तेव्हापासून ह्या मजुरांच्या सुटकेसाठी रात्रंदिवस रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. उत्तरकाशीतील सिल्क्यारा या बोगद्यात ४१ कामगार अडकल्याने संपूर्ण देशाच्या नजरा ह्या रेस्क्यू ऑपरेशनकडे लागलेल्या होत्या. ह्या ४१ मजुरांना बाहेर काढल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. सतरा दिवस ह्या अंधाऱ्या बोगद्यात अडकल्याने ह्या कामगारांना हायपर टेन्शनचा त्रास होऊ शकतो. तसंच त्यांची एंजायटीही वाढू शकते. त्यासाठी घटनास्थळी रुग्णवाहिकाही पाठवण्यात आल्या आहेत. ४१ मजुरांसाठी ४१ बेडदेखील तयार करण्यात आले आहेत.
ह्या मजुरांच्या सुटकेसाठी बोगद्यात ८०० मिमी व्यासाची पाईप सोडण्यात आली आहे. या पाईपमधून NDRF ची टीम ही मजुरांपर्यंत पोहोचली आहे. या पाईपद्वारेच मजुरांच्या सुटकेचे प्रयत्न करण्यात आलेले आहेत.
दिवाळीपासून मजूर बोगद्यात
उत्तरकाशी येथील टनेल रेस्क्यू ऑपरेशन हे गेल्या १६ दिवसांपासून सुरु आहे. संपूर्ण देशभरात दिवाळी साजरी होत असतानाच, दिवाळीच्या पहिल्या दिवशी माती कोसळल्यामुळे ४१ मजूर हे ह्या बोगद्यात अडकलेले आहेत. तेव्हापासूनच हे बचावकार्य सुरु आहे. दरम्यान, आज ह्या बचावकार्याचा आज १७ वा दिवस आहे.
हा बोगदा कशासाठी?
उत्तरकाशी येथील जिल्हा मुख्यालयापासून ३० किमी अंतरावर ह्या बोगद्याचं काम सुरु आहे. केंद्र सरकारची महत्त्वकांक्षी चारधाम ‘ऑल वेदर सडक’ सिल्कियारा ही योजना सुरु असून, ह्या प्रकल्पामुळे कोणत्याही वातावरणात याठिकाणी रस्ते वाहतूक ही करता येणार आहे. ब्रह्मखाल-यमुनोत्री ह्या राष्ट्रीय राज्यमार्गावरील या बोगद्याचं काम सुरु होतं. हा बोगद्याची लंबी ही ४.५ किमी इतकी आहे.
यंत्रणा एकवटल्या
ह्या बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांच्या सुटकेसाठी देशभरातील विविध यंत्रणा ह्या उत्तराखंडमध्ये एकवटल्या आहेत. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF), उत्तराखंड स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, नॅशनल हायवेज् अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, जे प्रकल्प बांधत आहेत व इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस यांसह विविध एजन्सीज् ह्या बचावकार्यात सहभागी झाल्या आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम