Skip to content

देवळा | गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई-आ. डॉ. राहुल आहेर


सोमनाथ जगताप-प्रतिनिधी : देवळा | डिसेंबर 2021 मध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या देवळा तालुक्यातील (16053) नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने 10 कोटी 54 लाख 92 हजार दोनशे चाळीस रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली असून ही रक्कम थेट संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती आमदार डॉ. राहुल आहेर यांनी मंगळवारी (दि. 28) रोजी दिली आहे.

नाशिक | बापाचं धक्कादायक कृत्य; पोटच्या पोराची सुपारी देऊन हत्या
देवळा तालुक्यात डिसेंबर 21 मध्ये मध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे कांदा, मका, डाळींब, टोमॅटो, द्राक्ष आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची आमदार डॉ. राहुल आहेर यांनी पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या होत्या. पंचनामे झाल्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने देवळा तालुका नुकसानग्रस्त यादीतून वगळून मालेगाव आणि येवला तालुक्याचा समावेश केला होता. त्यामुळे देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांवर तत्कालीन सरकारने अन्यायच केला होता.

Nashik News | नाशिकच्या नावे विश्वविक्रम; शिवरायांची १७ हजार चौरस फुटांची ‘ग्रंथरांगोळी’
याविरोधात आमदार डॉ.आहेर यांनी अधिवेशनात लक्षवेधी मांडत सरकारचे लक्ष वेधले होते. तरीही महाविकास आघाडीच्या सरकारने नुकसान भरपाई दिली नव्हती. आमदार डॉ. राहुल आहेर यांनी सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ही बाब लक्षात आणून देत डिसेंबर 2021 मध्ये झालेल्या नुकसान भरपाईसाठी तब्बल 10 कोटी 54 लाख 92 हजार दोनशे चाळीस रुपयांची मदत मंजूर करून घेतलेली आहे. यामुळे गेल्या वर्षांपूर्वी अन्याय झालेल्या देवळा तालुक्यातील 16053 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आमदार डॉ. राहुल आहेर यांनी खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला आहे. ही मदत राज्य शासनानेव्दारे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग केली जाणार आहे. यासाठी महसूल विभागाकडून लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी शेवटी सांगितले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!