Skip to content

आता फक्त ‘वेट अँड वॉच’-एकनाथराव खडसे


जळगाव : शिवसेनेत झालेल्या बंडामुळे राज्‍यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. या परिस्थितीवर  आता फक्त वेट आणि वॉच एवढीच भूमिका आमच्याकडे आहे; अशी प्रतिक्रिया माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे एका वृत्तवाहिनीला (Eknath Khadse) दिली.

 

दोन दिवसापूर्वी झालेल्या विधान परिषदे निवडणूकीत एकनाथराव खडसे हे विजयी झाले. ते  पहिल्यांदाच आज मुक्ताईनगरच्या त्यांच्या निवासस्थानी आले आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांच्या ते भेटीगाठी घेत असून सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा देखील होत आहे. त्यामुळे घडत असलेल्या घडामोडीमुळे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये खूप चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे असे मत एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!