Skip to content

ब्रेकिग: शरद पवार, सुप्रिया सुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला


 

मुंबई: शिवसेनेतील आमदारांनी काढलेला बंडामुळे आघाडी सरकार संकटात आली आहे. या अवघड राजकीय परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वी जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. तसेच नाराज आमदारांना भावनिक साथ देत मी मुख्यमंत्री पद सोडण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा  निवासस्थानी भेटण्यासाठी पोहोचले आहेत.

शिवसेनेचे नाराज मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत जवळपास तीस ते चाळीस आमदार सोबत घेऊन बंड पुकारला आहे. हे सर्व आमदार काल सुरत येथे तर आज सकाळी आसाम राज्यातील गुवाहटी पोहोचलेले आहेत. तेथूनच ते त्यांचे राजकीय सूत्र हलवीत असून त्यांच्या दिमतीला भाजपचेही नेते असल्याचे दिसत आहे.

मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही क्षणापूर्वी जनतेशी संवाद साधला असून त्यात शिवसैनिक हार मानणारा नसून लढणार आहे. मी मुख्यमंत्री नको हवा असेल तर मी हे पण सोडत आहे. तुम्ही पडू नका पुढे या असे भावनिक साद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातली आहे.

शरद पवार,सुप्रिया सुळे भेटीला

मिनिटामिनिटाला बदलणाऱ्या राजकीय घडामोडी वर तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्य पद सोडण्याच्या तयारीत असून महाविकास आघाडी सरकार वाचविण्यासाठी आता शरद पवार सुप्रिया सुळे या ॲक्शन मोडमध्ये आले असून ते मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी पोहोचले असून सध्याच्या राजकीय घडामोडींवर खलबते होणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!