Skip to content

वीज पडून युवकाचा मृत्यू; झाडाचा आडोसा जीवाशी


नाशिक प्रतिनिधी : राज्यात पावसाला प्रारंभ झाला असून सिन्नर तालुक्यातील शिवडे (Shivade) या गावात आज (दि.22) रोजी दुपारी पावणेचारच्या सुमारास एका तरुणाच्या अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी तसेच नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

मयत युवकाचे नाव रविंद्र आनंदा पवार (21) रा. एकलव्य वस्ती, शिवडे असे आहे. हा युवक आपल्या शेळया घेऊन परिसरात चारण्यासाठी फिरत होता मात्र काळाने घाला घालत दुपारी 3.30 च्या दरम्यान शिवडे (Shivade) परिसरात अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची सुरुवात झाली व या युवकचे जागीच प्राण गेले.

पावसाच्या वेळी रवींद्र गावातील जनता विद्यालयाच्या पाठीमागील जागेवर शेळ्या चारत असल्याची माहिती आहे. पाऊस सुरू (rain in shivade) झाल्याने तो जवळच असलेल्या एका झाडाखाली आडोसा घेतला इथे थांबलेला असताना जोराचा वारा व पाऊस सुरू झाला . त्याच वेळी झाडावर वीज पडल्याने रविंद्रला जोरदार झटका बसून त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी जात त्याला गावातील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. सिन्नर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!