Skip to content

मी मुख्यमंत्री पद सोडायला तयार पण……!


शिवसेना आणि हिंदुत्व हे बाजूला होवू शकत नाही, हिंदुत्व हा सेनेचा श्वास आहे. शिवसेना कोणाची आहे हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बाळासाहेबांचे विचार घेवून पुढे जात आहे मात्र तरी आता हा विचार का ? , मधल्या काळात जे मिळालं ते बाळासाहेबांच्या नंतरच्या शिवसेनामुळे मिळालं हे विसरू नका.

जबाबदारी अंगावर आल्यावर मी पूर्ण करणारा शिवसैनिक आहे. ज्यांच्याविरोधात लढलो त्यांच्या सोबत आता सत्तेत आहे. पवार साहेबांनी सांगीतले मुख्यमंत्री पदासाठी उद्धवजी तुम्हाला असावे लागेल कारण सर्व पक्षात ज्येष्ठ आहेत आणि ते दुसऱ्याच्या हाताखाली काम होईल अन् सरकार चालवणे अशक्य होईल, म्हणून मी जबाबदारी घेतली.

मला धक्का बसला तो याचा काँग्रेस व राष्ट्रवादीचे लोक मला मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत, मात्र माझ्या माणसाने अविश्वास दाखवला याचा धक्का बसला. त्यापैकी कोणेही सांगावे मी मुख्यमंत्री म्हणून नालायक आहे मी नको आहे तर ठीक मी राजीनामा देतो मात्र समोर येवुन बोला.

जे आमदार गायब आहेत त्यांनी राजीनाम्याची पत्र घेवून जावे, मी संकटाना घाबरत नाही, शिवसैनिक आहेत तोपर्यंत मी पक्ष प्रमुख राहील. शिवसैनिकांना वाटत असेल मी पक्षप्रमुख म्हणून नालायक आहे राजीनामा द्या तर मी नक्की देईल.

मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे. फक्त समोर येवुन सांगा….


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!