नागपुरात परतलेल्या शिवसेना आमदाराचा मोठा गौप्यस्फोट

0
23

मुंबई : संजय राऊत यांनी आमदारांचे अपहरण व मारहाण झाल्याचे आरोप केला होता. दरम्यान आमदाराला मारहाण झाली नसल्याचं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना केला होता. मात्र शिवसेना आमदार नितेश देशमुख हे नागपूरला परतले असून त्यांनी खळबळ माहिती दिली आहे.

 

शिवसेनेचे आमदार नितेश देशमुख सुद्धा हे कालपासून शिंदे यांच्यासोबत सुरत मध्ये होते या घडामोडी दरम्यान त्यांना हृदयवीकाराचा त्रास झाल्याने सुरत येथील रुग्णालयात दाखल केल्याचे सांगण्यात आले होते. तर नितेश देशमुख यांना बळजबरीने तिथं ठेवल्या जात असल्याचं त्यांच्या परिवाराने देखील शंका उपस्थित केली होती. तसेच त्यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केलेली होती.

 

आणि नितेश देशमुख नागपुरात आले…

शिवसेना आमदार नितेश देशमुख आज सकाळी नागपूर येथे पोहचले असून त्यांनी सर्व प्रकारबद्दल खळबळजनक मोठा गौप्य नागपूर विमानतळवर प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितलं की माझ्या दंडावर बळजबरीने इंजेक्शन टोचले,मला हार्ट अॅटक आलाच नाही असा खळबळजनक खुलासा केला आहे. मी शिवसैनिक आणि राहणार, मी उद्धव ठाकरे साहेबांचा सैनिक आहे मी उद्धव साहेबांसोबत असल्याचं स्पष्ट केलं आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here