Skip to content

Nashik News | चांदवडच्या ह्या गावांना वागदर्डीतून पाणीपुरवठा


Nashik News |  नाशिकच्या चांदवड तालुक्यातील पूर्व भागातील पाच गावांना जलजीवन मिशनच्या अंतर्गत पेयजल योजना ही मंजूर झाली आहे. धरणाजवळच योजनेसाठी शाश्वत जलस्रोत निर्माण करत कायमस्वरूपी टँकरग्रस्त असलेल्या निमोण, दरेगाव, डोणगाव, वाद-वराडी ह्या पाच गावांना पाणीपुरवठा केला जाणार आहे.

ह्या योजनेला सात कोटींपेक्षा अधिक निधीची गरज असून, प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ही राबविणे संयुक्तिक असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी अभियान संचालकांना दिलेला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे ही योजना राबवली जाणार आहे.

निमोण, वाद-वराडी, दरेगाव, डोणगाव ह्या गावांसाठी केंद्र सरकारच्या जलजीवन ह्या मिशनच्या अंतर्गत पेयजल योजना मंजूर झाल्या होत्या. प्रत्येक गावांत योजनेच्या कामाच्या कार्यारंभाचा आदेश निघालेला आहे. पण, पूर्व भागातील गावात खडकाळ भूपृष्ठ असल्याने पाणी धारण करण्याची क्षमता कमी आहे. ही परिस्थिती बघता, या परिसरात शाश्वत स्रोत नसल्यामुळे पेयजल योजनेवर खर्च करून नागरिकांना फायदा मिळणार नाही.

Nashik Crime | निफाडमध्ये दुकान मालकाला मारहाण करत, लाखोंची रोकड केली पसार

योजनेवर खर्च करूनही ही गावे तहानलेली राहतील. म्हणून या गावातील सरपंचांनी योजना राबवण्यास विरोध दर्शवला होता. वागदर्डी धरणाजवळ जलस्रोत तयार केल्यास योजनेतील गावांना पाणीपुरवठा करणे शक्य होईल, अशी भूमिका गावच्या सरपंचांनी घेतली होती.

पाणी प्रश्‍नी डॉ. आहेर यांनी सरकारकडे पाठपुरावाही केला होता. वागदर्डी धरणातून जलस्रोत कसा निर्माण होऊ शकतो, याच्या अभ्यासासाठी तांत्रिक समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने ऑगस्टमध्ये प्रत्यक्ष पाहणीदेखील केली होती.

शाश्वत जलस्रोत आणि योजना राबविणे शक्य असल्याचा अहवाल समितीने नुकताच दिला आहे. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी राज्य पाणी आणि स्वच्छता मिशनच्या अभियान संचालकांना पाणीपुरवठा योजना राबविण्याचा अहवाल पाठवत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला योजना राबविण्याचे आदेश देण्याची विनंती केली आहे.

सर्वच गावे टंचाईग्रस्त

जलजीवन योजनेत समाविष्ट पाच गावे टंचाईग्रस्त आहेत. या गावांना दरवर्षी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो आहे. निमोण आणि वाद-वराडीचे टँकर हे मागील महिन्यापासून बंद झालेले आहेत. डोणगाव आणि दरेगाव येथे टँकर सुरू आहे.

Manoj Jarange | केस पांढरे करून उपयोग काय; भुजबळांच्या भाषणावर जरांगेंच प्रत्युत्तर


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!